एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:39 AM2019-05-21T00:39:53+5:302019-05-21T00:40:18+5:30

मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले

 The three sets of single-unit constructions are operated | एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित

एकलहरे केंद्रातील तिन्ही निर्मिती संच कार्यान्वित

googlenewsNext

एकलहरे : मे महिन्याच्या वाढत्या उकाड्यामुळे राज्यात सर्वत्र विजेची मागणी वाढल्यामुळे उत्पादित होणारी वीज अपुरी पडू लागल्याने त्यावर पर्याय म्हणून एकलहरे औष्णिक वीज केंद्राचे तीनही संच पूर्ण क्षमतेने सुरू ठेवण्यात आले असून, त्याद्वारे राज्याची विजेची मागणी पूर्ण करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून एकलहरे येथील  एकच संच कार्यान्वित करण्यात आला होता.
कोळशाची उपलब्धता, विजेचे दर परवडत नसल्याच्या कारणावरून सरकारने एकलहरेच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मितीसाठी हात अखडता घेतला होता. तीनपैकी एकच संच सुरू ठेवण्यात आल्याने येथील कामगारांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला होता. एकलहरेच्या २१० मेगावॅट क्षमतेच्या ३ संचांपैकी संच क्रमांक ४ व ५ मधून पूर्ण क्षमतेने वीज उत्पादन सुरू ठेवून संच क्रमांक ३ स्टँडबाय ठेवण्यात आला होता. मात्र आता उन्हाळ्यामुळे राज्यात विजेची मागणी वाढली आहे, त्यामुळे एकलहरे येथील स्टँडबाय ठेवलेला संच क्रमांक तीनदेखील सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या एकलहरेचे तीनही संच पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती करीत आहेत. एकलहरे औष्णिक वीज केंद्रात संचालक संचलनाचे पाच सूत्री कार्यक्रमानुसार निरनिराळ्या धेयधोरणांची अंमलबजावणी, नवनवीन संकल्पना, संवादात्मक कार्यक्रम राबवून अंमलबजावणी करण्यात येते.
१० जानेवारी २०१९ पासून नाशिक औष्णिक वीज केंद्रातील एकच संच कार्यान्वित होता. विजेच्या वाढत्या मागणीमुळे दिनांक २८ मार्च रोजी सकाळी २१० मेगावॅटचा संच क्रमांक ५ संपूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आला व तीनपैकी दोन संच सुरू झाले होते. यापूर्वी कमी विजेच्या मागणीमुळे सदर संच संपूर्ण क्षमतेने चालवता येत नव्हते, तसेच इतर संच उपलब्ध असूनसुद्धा सुरू करता येत नव्हते. नाशिक औष्णिक विद्युत केंद्रावर सातत्याने एक किंवा दोन संच चालू असायचे, परंतु आता मात्र तिन्ही संच बऱ्याच दिवसांनी पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत.  - उमाकांत निखारे, मुख्य अभियंता, एकलहरे केंद्र

Web Title:  The three sets of single-unit constructions are operated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.