तीन दरोडेखोरांना अटक

By admin | Published: April 20, 2017 05:35 PM2017-04-20T17:35:00+5:302017-04-20T17:35:00+5:30

देवळाली प्रवरा येथील सहा जणांच्या टोळीतील तिघांना अमरावती,जालना व बीड जिल्ह्यात रस्तालूट प्रकरणी राहुरी व जालना पोलिसांनी अटक केली़

Three robbers arrested | तीन दरोडेखोरांना अटक

तीन दरोडेखोरांना अटक

Next
हुरी : देवळाली प्रवरा येथील सहा जणांच्या टोळीतील तिघांना अमरावती,जालना व बीड जिल्ह्यात रस्तालूट प्रकरणी राहुरी व जालना पोलिसांनी अटक केली़रवींद्र शिंदे (वय २२) अजय दुशिंग (वय २१),सागर पंडित (वय २४),राकेश संसारे (वय २१),बबलू शिरसाट (वय २१, सर्व राहणार देवळाली प्रवरा), रतन उर्फ अमोल गरूड (वय २२) या सहा जणांच्या टोळीने जालना,अमरावती व बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रस्ता लूट करून प्रवाशांना हैराण केले होते. अनेक दिवसांपासून तीन जिल्ह्यांचे पोलीस टोळीचा शोध घेत होते़ गेल्या १५ दिवसांपूर्वी राहुरी येथील दूध टँकर जालना येथे गेला होता़ या टँकरवरील चालक मोहन शिंदे हा रात्री जालना येथील मंठा रस्त्याच्या कडेला झोपला होता़ सहा जणांची टोळी अचानक येऊन चालक शिंदे यास मारहाण करून ५० हजार रूपये रोख व मोबाईलची लूट करून पसार झाले होते़टँकर चालक मोहन शिंदे यांनी याबाबत जालना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती़ गुन्ह्याच्या तपासादरम्यान जालना येथील पोलीस नाईक विष्णू चव्हाण,पर्वत मुंढे,कल्याण आटोळे,नसीर पठाण यांच्या पथकाने १९ एप्रिलला राहुरीचे निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील पोलीस नाईक गौतम लगड व सतीष त्रिभुवन यांच्या मदतीने रवींद्र शिंदे व अजय दुशिंग या दोघांना राहत्या घरी छापा टाकून पकडले़ याशिवाय सागर पंडित याला पाठलाग करून ताब्यात घेतले़ सहापैकी एक आरोपी हा नगर व पाच आरोपी देवळाली प्रवरा येथील आहेत़ या आरोपींच्या माध्यमातून महत्त्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे़

Web Title: Three robbers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.