शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 00:30 IST2019-02-24T00:27:58+5:302019-02-24T00:30:46+5:30
म्हसरूळ शिवारातील बोरगड परिसरात बेकायदा धारदार शस्त्र बाळगणाºया तिघा संशयितांना शुक्रवारी (दि.२२) म्हसरूळ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त केले आहे.

शस्त्र बाळगणाऱ्या तिघांना अटक
पंचवटी : म्हसरूळ शिवारातील बोरगड परिसरात बेकायदा धारदार शस्त्र बाळगणाºया तिघा संशयितांना शुक्रवारी (दि.२२) म्हसरूळ पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्याकडून धारदार शस्त्र जप्त केले आहे.
बोरगड येथील ए. टी. पवार आश्रमशाळेच्या मागील भागात कारवाई करीत म्हसरूळ पोलिसांनी येथे राहणाºया संशयित युवराज पन्नालाल सोनवणे, अमोल कडू- पगार आणि सोमनाथ श्यामराव पवार या तिघांना अटक केली असून, त्यांच्याकडून दुचाकीसह धारदार शस्त्र जप्त केले आहेत. संशयित आरोपी बोरगड परिसरात दुचाकीवरून क्रमांक (एम एच १५, डीपी ८०९९) धारदार सुरा लावून ट्रिपल सीट फिरत असताना पोलिसांनी त्यांना हटकले. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या दुचाकीच्या हेडलाइटजवळ धारदार सुरा लावलेला आढळून आला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांना अटक करून शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलीस उपनिरीक्षक संजय पवार तपास करीत आहेत.