वनारवाडी शिवारात अपघातात कुटुंबातील तिघांसह चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2018 00:15 IST2018-02-23T00:11:02+5:302018-02-23T00:15:26+5:30
दिंडोरी : नाशिक - कळवण मार्गावरील वनारवाडी शिवारात चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबांतील तिघेजण मयत झाले असून, कारचालकही जागीच ठार झाला आहे.

वनारवाडी शिवारात अपघातात कुटुंबातील तिघांसह चालक ठार
दिंडोरी : नाशिक - कळवण मार्गावरील वनारवाडी शिवारात चारचाकी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीवरील एकाच कुटुंबांतील तिघेजण मयत झाले असून, कारचालकही जागीच ठार झाला आहे.
वनारवाडी फाट्यावर बुधवारी (दि. २१) रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास झायलो (क्र. एमएच ०२ बीटी ८४२४) नाशिककडे जात असताना दिंडोरीकडे येत असलेल्या दुचाकी (क्र. एमएच १५ एच ५५२०) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाल्याने दुचाकीवरील राजाराम पांडुरंग बोराडे (५०), सुनीता राजाराम बोराडे (४५) दांपत्य व त्यांचा मुलगा भाविश (१७) हे तिघे नातेवाइकाकडून कार्यक्रम आटोपून घरी येत असताना झालेल्या अपघातात जागीच ठार झाले आहेत, तर पिंपळगाव धूम येथील झायलोचालक राहुल वसंत बेजेकर (२७) हे जागीच ठार झाले. बोराडे कुटुंब हे मूळ विल्होळी, नाशिक येथील असून, एक वर्षापासून पाडे येथे शेती घेऊन राहत होते.
दिंडोरी पोलिसांत अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक राजेश शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास करीत
आहे.