आॅनलाइन रौलेट चालविणाऱ्या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 00:45 IST2018-09-16T00:45:35+5:302018-09-16T00:45:58+5:30

शहरात चोरीछुप्या पद्धतीने मोबाइलवरून चालणाºया बिंगो-रौलेट नावाच्या अवैध धंद्यावर गुन्हे शाखेची करडी नजर असून, पोलिसांनी अशाच पद्धतीने आॅनलाइन जुगार खेळणाºया तिघा संशयितांना अटक केली आहे.

Three of the online roulette operators arrested | आॅनलाइन रौलेट चालविणाऱ्या तिघांना अटक

आॅनलाइन रौलेट चालविणाऱ्या तिघांना अटक

नाशिक : शहरात चोरीछुप्या पद्धतीने मोबाइलवरून चालणाºया बिंगो-रौलेट नावाच्या अवैध धंद्यावर गुन्हे शाखेची करडी नजर असून, पोलिसांनी अशाच पद्धतीने आॅनलाइन जुगार खेळणाºया तिघा संशयितांना अटक केली आहे.
गुन्हे शाखा युनिट-१चे पोलीस उपनिरीक्षक बी. बी. पालकर, स्वप्नील जुंद्रे यांना गुप्त माहितीगारामार्फत शालिमार भागात एका मोकळ्या जागेत काही संशयित मोबाइलवरून आॅनलाइन बिंगो-रौलेट नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक आनंदा वाघ यांच्यासह पथकाने या ठिकाणी छापा मारून संशयित संकेत शेलार (२२, वावरे लेन), सुरज उगलमुगले (२४, रा. मखमलाबादरोड), कैलास शहा (२८, रा. गंगापूररोड) यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.

Web Title: Three of the online roulette operators arrested