तीन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 12:06 AM2018-06-21T00:06:29+5:302018-06-21T00:06:29+5:30

शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरूच असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डीरोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

 Three lodge in one house | तीन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास

तीन घरफोड्यांमध्ये दीड लाखाचा ऐवज लंपास

Next

नाशिक : शहरात गत अनेक दिवसांपासून घरफोडीचे सत्र सुरूच असून, जेलरोड, गंगापूररोड व वडाळा-पाथर्डीरोड परिसरात चोरट्यांनी तीन ठिकाणी घरफोडी करून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे़ यामध्ये सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाइलचा समावेश आहे़ या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात घरफोडीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़  सोसायटीतील फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (दि. १९) दुपारच्या सुमारास जेलरोडच्या कॅनॉल रोड परिसरात घडली़ पंचगंगा हौसिंग सोसायटीतील धमेंद्र अहिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दुपारच्या सुमारास घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला़ तसेच घरातील बेडरूममध्ये ठेवलेले पाऊण लाखाचे दागिने चोरून नेले़ यामध्ये पन्नास हजार रुपये किमतीची सोन्याची पोत, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची चेन व २० हजार रुपयांच्या नेकलेसचा समावेश आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  गंगापूर रोडवरील आकाशवाणी टॉवर परिसरात घरफोडीची दुसरी घटना शनिवारी (दि़ १६) घडली़ संगीता तारगे (रा़ श्रद्धा बंगला, पोस्टआॅफिसशेजारी, सावरकरनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बबिता ऊर्फ बेबी ज्ञानेश्वर कासार हिने तारगे बंगल्यातील बेडरूममध्ये प्रवेश करून ओम आकाराचे सोन्याचे लॉकेट व सोन्याची चेन असा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला़ या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तिसरी घटना वडाळा-पाथर्डी रोडवरील विनयनगरलगत असलेल्या कालिका पेट्रोलपंप परिसरात मंगळवारी (दि़१९) घडली़ सुनील शिंदे (रा़ उज्ज्वल बंगला, संत नामदेव सोसायटीशेजारी, विनयनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंगल्याच्या जिन्याजवळील लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून बंगल्यात प्रवेश केला़ तसेच बेडरूममधून पलंगावर असलेला दहा हजार रुपयांचा सॅमसंग कंपनीचा मोबाइल फोन चोरून नेला. या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
भाडेकरूची माहिती न देणाऱ्या घरमालकावर गुन्हा
घर भाडेतत्त्वावर देऊन त्यातील भाडेकरूची माहिती स्थानिक पोलिसांना न देणाºया फ्लॅटमालकावर इंदिरानगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे़ परशराम रामदास साबळे (रा़ वणी, ता. दिंडोरी) असे गुन्हा केलेल्या घरमालकाचे नाव आहे. साबळे यांचा पांडवनगरीतील जनगौरव इमारतीतील फ्लॅट नंबर ४१४४ (ए विंग) मध्ये १५ नंबरचा फ्लॅट आहे़ हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले मात्र त्याची माहिती इंदिरानगर पोलिसांना दिलीच नाही़ या प्रकरणी पोलीस शिपाई ताहीर शेख यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे़

Web Title:  Three lodge in one house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.