दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख रुपयांची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 01:02 IST2019-03-19T22:25:26+5:302019-03-20T01:02:03+5:30
सीबीएस परिसरात एका दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपयांची चोरी केल्याची घटना शनिवारी (दि. १७) घडली आहे.

दुचाकीच्या डिक्कीतून तीन लाख रुपयांची चोरी
नाशिक : सीबीएस परिसरात एका दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी तीन लाख रुपयांची चोरी केल्याची घटना शनिवारी (दि. १७) घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकतानगर भागातील अश्लेषा सोसायटीत राहणारे संतोष हरिभाऊ थोरकर (३६) यांनी पंचवटीतील एका बँकेतून तीन लाख रुपयांची रक्कम काढली होती. ही रक्कम आपल्या एमएच १५, सीएफ ७३३० या क्रमांक असलेल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते मुंबई नाक्याच्या दिशेने जात असताना सीबीएस सिग्नल येथे थांबले होते. त्याचवेळी कोणीतरी अज्ञात चोरट्याने संतोष थोरकर यांच्या दुचाकीची डिक्की उघडून सदर रक्कम चोरून नेली. या प्रकरणी थोरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.