सिन्नर तालुक्यात दोन अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:16 IST2018-06-01T01:16:09+5:302018-06-01T01:16:09+5:30

सिन्नर : दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली.

Three killed in two road accidents in Sinnar taluka | सिन्नर तालुक्यात दोन अपघातात तीन ठार

सिन्नर तालुक्यात दोन अपघातात तीन ठार

ठळक मुद्देदुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू पत्नी मंगल या जखमी झाल्या तर बालिका बचावली

सिन्नर : दोन वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली. तिघेही मृत दुचाकीवरून प्रवास करीत होते. सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील अपघातात एक तर सिन्नर- सायखेडा रस्त्यावरील अपघातात दोघे ठार झाले. सिन्नर- नायगाव मार्गावर आयशर टेम्पो व दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.
दीपक पाटोळे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, निरीक्षक हरिभाऊ कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. आयशर टेम्पो (क्र. एमएच १५ बीजे ३१९५) व डिस्कव्हर (क्र. एमएच १५ डीडी ३७८९) यांच्यात हा अपघात झाला. दुचाकीवरील गणेश सोमनाथ टर्ले (१८, रा. चांदोरी, ता. निफाड), गणेश सुभाष सुरवाडे (२९, रा. रामाचे पिंपळस, ता.निफाड) यांना दुखापत झाली. त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले सकाळी ११.३० वाजता शिर्डी रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मिठसागरे येथील एकजण ठार झाला. लक्ष्मण चंद्रभान चतूर (५०) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांची पत्नी मंगल या जखमी झाल्या तर चार वर्षीय बालिका बचावली.

Web Title: Three killed in two road accidents in Sinnar taluka

टॅग्स :Accidentअपघात