ट्रक-कार अपघातात तीन जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 00:54 IST2020-12-22T22:06:37+5:302020-12-23T00:54:14+5:30
उमराणे : राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ सोमवारी (दि.२१) रात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन कारमधील दोन जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

उमराणेजवळ झालेल्या भीषण अपघातात कारचा झालेला चक्काचूर.
उमराणे : राष्ट्रीय महामार्गावरील उमराणे गावाजवळ सोमवारी (दि.२१) रात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात होऊन कारमधील दोन जण जागीच ठार, तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सोमवारी (दि.२१) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास मालेगावकडून नाशिककडे जाणाऱ्या तवेरा कारला ( क्र. एमएच १५ एम ८७१२) ओव्हर टेक करण्याच्या नादात ट्रकने (एमएच ४३ ई १८०६ ) जोरदार धडक दिल्याने कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. कारमध्ये असलेल्या पाच जणांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला.
गंभीर जखमी असलेल्या तिघांना मालेगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर अन्य दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. अज्ञात ट्रकचालकाविरोधात देवळा पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अपघातातील मृतांची व जखमींची नावे उशिरापर्यंत समजू शकली नाही.