गुजरात राष्ट्रीय महामार्गावर अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2022 02:05 IST2022-07-01T02:04:48+5:302022-07-01T02:05:28+5:30

नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८वर मोहाचापाडा फाटयाजवळ ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी घडली.

Three killed on Gujarat National Highway | गुजरात राष्ट्रीय महामार्गावर अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

गुजरात राष्ट्रीय महामार्गावर अपघातात तिघांचा जागीच मृत्यू

पेठ : नाशिक ते गुजरात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८४८वर मोहाचापाडा फाटयाजवळ ट्रक व दुचाकीत झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि.३०) दुपारी घडली.

याबाबत पेठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी गुजरातकडून नाशिककडे जाणारा ट्रक (एमएच १२ क्यू डब्ल्यू ६७८९) व पेठकडून गुजरातकडे जाणारी दुचाकी (एमएच १५ एचएन ७०२५) यांच्यात कुंभाळे शिवारात मोहाचापाडा फाट्यानजीक समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील रमेश गणपत कडाळी (वय २८, रा. नालशेत, ता. पेठ), निर्मला सोमनाथ गडदे (वय १८, रा. हट्टीपाडा, ता. पेठ व अविनाश कुवर (वय २८, रा . चौसाळा, ता. कापराडा) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की ट्रकसमवेत दुचाकी १० ते १५ फुट फरफटत गेली. याबाबत पेठ पोलिसांत अपघाताचा गुन्हा नोंदण्यात आला असून, सहायक पोलीस उपनिरीक्षक कपिले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार डंबाळे अधिक तपास करीत आहेत.

 

Web Title: Three killed on Gujarat National Highway