महामार्गावर सेंधव्याजवळ नामपूर येथील तिघे अपघातात ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 01:03 IST2017-11-23T00:56:35+5:302017-11-23T01:03:43+5:30
भरधाव कंटेनर समोरून येणाºया रिक्षावर आदळल्याने झालेल्या अपघातात आई, वडील आणि मुलगा असे तीन जण जागीच ठार झाले. महामार्गावर सेंधव्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. मृत नामपूर येथील योगायोग चौकातील रहिवासी आहेत. (पान ७ वर) सेंधव्याजवळील खडकीय नर्सरीजवळ अनियंत्रित झालेला कंटेनरने रिक्षाला धडक दिली. यात कंटेनर रिक्षावर चढल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात नाशिक येथील सोमनाथ अहिरे, त्यांची पत्नी ताराबाई अहिरे व मुलगा नरेंद्र अहिरे या तिघांचा दबून जागीच मृत्यू झाला. ते सेंधवा येथून रिक्षाद्वारे खडकीया नर्सरी येथील आयुर्वेद चिकित्सा केंद्रात जात होते.

महामार्गावर सेंधव्याजवळ नामपूर येथील तिघे अपघातात ठार
नामपूर : भरधाव कंटेनर समोरून येणाºया रिक्षावर आदळल्याने झालेल्या अपघातात आई, वडील आणि मुलगा असे तीन जण जागीच ठार झाले. महामार्गावर सेंधव्याजवळ बुधवारी हा अपघात झाला. मृत नामपूर येथील योगायोग चौकातील रहिवासी आहेत.
सेंधव्याजवळील खडकीय नर्सरीजवळ अनियंत्रित झालेला कंटेनरने रिक्षाला धडक दिली. यात कंटेनर रिक्षावर चढल्याने रिक्षाचा चक्काचूर झाला. या भीषण अपघातात नाशिक येथील सोमनाथ अहिरे, त्यांची पत्नी ताराबाई अहिरे व मुलगा नरेंद्र अहिरे या तिघांचा दबून जागीच मृत्यू झाला. ते सेंधवा येथून रिक्षाद्वारे खडकीया नर्सरी येथील आयुर्वेद चिकित्सा केंद्रात जात होते. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. अपघाताचे वृत्त कळताच पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी क्रेनच्या सहाय्याने मृतदेह रिक्षातून बाहेर काढले आणि जिल्हा रूग्णालयात पाठविले. या अपघातात रिक्षाचालक आरिफ युसूफ गंभीर जखमी झाला असून त्यास जिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले आहे.