चांदवड : तालुक्यातील कोकणखेडे शिवारात चांदवड-मनमाड रोडवर शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास लुना आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले.चांदवड-मनमाड रस्त्यावर ज्ञानेश्वर सोनवणे हे लुनावरून (एमएच १५ एफएक्स ८५७४) पत्नी व मुलासह जात होते. त्याचवेळी मनमाडकडून येणाऱ्या ट्रेलरशी (आरजे ०१ जीबी २४४१) त्यांची धडक झाली. दुचाकीवरील तिघेही ट्रेलर खाली चेंगरले गेले. या अपघातात ज्ञानेश्वर हरिभाऊ सोनवणे (४१), त्यांचा मुलगा गौरव ऊर्फखंडू (५) हे दोघे जागीच ठार झाले, तर ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या पत्नी आशाबाई (३५) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने चांदवड येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या अपघातातील सर्व मृत हे तालुक्यातील दुगावचे रहिवासी आहेत. या घटनेने दुगाववर शोककळा पसरली आहे.
अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 01:20 IST
चांदवड : तालुक्यातील कोकणखेडे शिवारात चांदवड-मनमाड रोडवर शुक्रवारी (दि. १८) सकाळी ११ वाजेच्या सुमारास लुना आणि ट्रेलर यांच्यात झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार झाले.
अपघातात एकाच कुटुंबातील तिघे ठार
ठळक मुद्देचांदवड तालुक्यातील दुर्घटना : लुना-ट्रेलरची धडक; दुगाववर शोककळा