Three injured in tractor-car accident near Shirwad | शिरवाडेनजीक ट्रॅक्टर-कार अपघातात तीन जखमी

शिरवाडेनजीक ट्रॅक्टर-कार अपघातात तीन जखमी

ठळक मुद्देतिघे जण गंभीर जखमी झाले.

शिरवाडे वणी : शिरवाडेनजीक खडकजांब शिवारात रविवारी सकाळी ९ वाजता यश पेट्रोल पंपासमोर मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रॅक्टरवर इंडिगो सी एन टाटा कंपनीची कार आदळल्याने झालेल्या अपघातात तीनजण गंभीर जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
रविवारी (दि.२८) सकाळी ९ वाजता मुंबई-आग्रा महामार्गने मालेगावहून नाशिककडे भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच ०२ -६३७२) सी एन टाटा कंपनीच्या इंडिगो कारमधून मालेगावचे प्रवासी जात असताना शिरवाडेनजीक खडकजांब शिवारात यश पेट्रोलपंपासमोर अचानक ट्रॅक्टर आडवा आल्याने हा अपघात घडला. या अपघातात सय्यद नईम सैफिकली, अहमद ईकलाब, अहमद शेख (सर्व रा. मालेगाव) हे तिघे जण गंभीर जखमी झाले.
अपघाताचे वृत्त समजताच शिरवाडे फाटा येथील रुग्णवाहिका चालक मधुकर गवळी यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.

Web Title: Three injured in tractor-car accident near Shirwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.