माळवाडीजवळ कार उलटून तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 23:43 IST2018-11-07T23:41:51+5:302018-11-07T23:43:54+5:30

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील माळवाडी गावात स्विफ्ट कार उलटून तीनजण जखमी झाले. संगमनेरच्या दिशेने वेगाने चाललेल्या कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. बुधवारी (दि. ७) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.

Three injured in Malwadi road crash | माळवाडीजवळ कार उलटून तीन जखमी

माळवाडीजवळ कार उलटून तीन जखमी

ठळक मुद्देनांदूरशिंगोटे पोलीस चौकीत अपघाताची नोंद

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर तालुक्यातील माळवाडी गावात स्विफ्ट कार उलटून तीनजण जखमी झाले. संगमनेरच्या दिशेने वेगाने चाललेल्या कारवरील नियंत्रण सुटून हा अपघात झाला. बुधवारी (दि. ७) दुपारी तीनच्या सुमारास हा अपघात झाला.
येथील पुलावर दुभाजकाला आदळून कार बोगद्याला अडकली. महामार्ग पोलिसांनी मदत केली. कारमधील दोन महिला व चालकास सिन्नर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. कार बोगद्याच्या कठड्याला अडकल्याने सुदैवाने प्रवासी वाचले. याबाबत नांदूरशिंगोटे पोलीस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

 

Web Title: Three injured in Malwadi road crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात