शहरं
Join us  
Trending Stories
1
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
2
एकनाथ शिंदेंच्या गडाला भाजपा सुरूंग लावणार?; ठाण्यात स्वबळावर लढण्याची तयारी, इच्छुकांची शाळा
3
पहिल्याच दिवशी ६०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; २७% प्रीमिअमसह बंपर लिस्टिंग, तुमच्याकडे आहे?
4
आम्ही आधी आमच्या देशाचा विचार करू; डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'त्या' दाव्यावर भारताची स्पष्टोक्ती
5
बर्फामुळे रस्त्यावर भयानक थरार! एका क्षणात १३० हून अधिक गाड्यांचा चक्काचूर; ‘हा’ व्हिडीओ तुम्ही पाहिला का?
6
डोनाल्ड ट्रम्प ज्या देशावर चिडतात, त्यालाच भारत देणार 'आकाश' मिसाइल; अमेरिकेला दिला झटका
7
कर्जदाराचा मृत्यू झाल्यास बँक कर्जाची वसुली कशी करते? गृह, कार आणि पर्सनल लोनचे नियम काय सांगतात?
8
ऑस्ट्रेलियाला जाण्यापूर्वी विराट कोहलीने या व्यक्तीच्या नावावर केली मालमत्ता, किती कोटींची संपत्ती?
9
कर्तव्यनिष्ठेला सलाम! पोलिओ लसीकरणासाठी 'आशा वर्कर'ची २८ किमीची पायपीट, मुलांसाठी धडपड
10
जीएसटी 2.0: घरगुती फराळावर जीएसटी कपातीचा किती फायदा झाला? पहाल तर शॉक व्हाल....
11
'या' ५ घटनांचा उल्लेख करत राहुल गांधींनी निशाणा साधला; म्हणाले, “मोदी हे ट्रम्प यांना घाबरतात”
12
PM मोदींच्या वाढदिवसाला सुरु केलेल्या १० योजना बंद? अंबादास दानवे आक्रमक; शिंदेंना करुन दिली 'बाळासाहेबां'ची आठवण
13
कतारने पुन्हा एकदा दाखवली आपली ताकद! एका फोनवर थांबवलं पाक-अफगाणिस्तानचं युद्ध 
14
Video - भलताच स्टार्टअप! तिकीट काढलं, मेट्रोत चढला अन् मागितली भीक; प्रवासी झाले हैराण
15
कायद्याचा गुन्हेगारांना धाक, तर जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे; मुख्यमंत्री विष्णु देव साय यांचे कडक निर्देश
16
राज ठाकरेंनी केली नक्कल, अजितदादांनी दिले उत्तर; म्हणाले, “मिमिक्री करणारे फक्त आता...”
17
अंकुश चौधरी-तेजश्री प्रधानच्या 'ती सध्या काय करते'चा सीक्वेल येणार? सतीश राजवाडे म्हणाले...
18
रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारताची 'नो कमेंट', पण भूमिकेवर ठाम
19
धक्कादायक! मोबाईलवर गेम खेळताना १३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; 'सडन गेमर डेथ' म्हणजे काय?
20
मिलेनियल्स ठरवत आहेत घरांचा ट्रेंड; १ ते १.५ कोटी रुपयांच्या घरांना मिळतेय सर्वाधिक पसंती, कोणतं शहर आवडीचं?

नाशकात सोनसाखळीचोरीचे सत्र सुरूच इंदिरानगरमध्ये दसऱ्यापासून तीन घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 17:57 IST

महिलांच्या दागिन्यांवर नजर असलेल्या सोनसाखळी चोरांनी दसऱ्यापासून तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनसाखळी चोरी करून हॅट्रीक केल्याने या भागात महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल केवळ क्यूआर कोड स्कॅनिंगच्या प्रक्रियेत व्यस्त असताना  दुसरीकडे सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

ठळक मुद्देइंदिरानगर परिसरात चोरट्यांना धुमाकुळ दसऱ्यापासून खेचल्या तीन महिलांच्या सोनसाखळ्या परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण

नाशिक  : परिसरात महिलांच्या दागिन्यांवर नजर असलेल्या सोनसाखळी चोरांनी दसऱ्यापासून तीन दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये सोनसाखळी चोरी करून हॅट्रीक केल्याने या भागात महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बीट मार्शल केवळ क्यूआर कोड स्कॅनिंगच्या प्रक्रियेत व्यस्त असताना  दुसरीकडे सोनसाखळी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.बजरंग कॉलनीच्या रस्त्यावरून जाणाऱ्या पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटनासोमवारी (दि.७) घडली. ओजस अवन्यू येथील प्रीती आळंद त्यांच्या सासूबरोबर दसऱ्यासाठी झेंडूची फुले घेण्यासाठी रथचक्र चौकात गेल्या होत्या. त्या परतत असताना बजरंग कॉलनी येथे समोरून आलेल्या दुचाकीवरस्वारांनी प्रीती आळंद यांच्या गळ्यातील सुमारे १५ ग्रॅम वजनाचसुमारे वीस हजार किमतीची सोनसाखळीओरबडून पोबारा केला. ही घटना ताजी असताना दुसºया दिवशी मंगळवारी (दि.८) चैतन्यनगरच्या शिवपॅलेस अपार्टमेंटमधील रूपाली जाधव या रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास राणेनगर येथील सप्तशृंगी मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना चेतना नगर भागात  समोरून आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेले. तर गुरुवारी(दि १०) रोजी कल्पणा अहिरे  पती समवेत रात्री दहा वाजता सुमन बंगल्या समोरून जात असताना काळा रंगाच्या दुचाकीवर आलेल्या दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे ६२ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले. त्यामुळे परिसरातील महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकThiefचोरPoliceपोलिस