संसरी नाक्यावर तीन तास वाहतूक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 00:29 IST2019-03-17T00:07:32+5:302019-03-17T00:29:12+5:30

देवळालीच्या संसरी नाक्यावर भुयारी गटार योजनेमुळे शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत वाहतुकीची चांगलीच कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Three-hour traffic shutdown on the sunshine nose | संसरी नाक्यावर तीन तास वाहतूक कोंडी

संसरी नाक्यावर तीन तास वाहतूक कोंडी

ठळक मुद्देदेवळाली नाका : भुयारी गटार योजनेच्या कामामुळे खोळंबा

देवळाली कॅम्प : देवळालीच्या संसरी नाक्यावर भुयारी गटार योजनेमुळे शनिवारी सकाळी साडेअकरा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत वाहतुकीची चांगलीच कोंडी झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागला. वाहतूक सुरुळीत झाल्यानंतर ही वाहतूक पोलीस आले नसल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली.
देवळाली कॅन्टोमेंन्ट बोर्डाकडून भुयारी गटारी योजनेचे काम सुरू असून, शुक्रवारपासून संसरी नाका येथे काम सुरू झाल्याने वाहतुकीची कोंडी होत होती. शनिवारी वाहतूक सुरुळीत होण्यासाठी कोणतीही उपाययोजना करता, काम सुरू करण्यात आल्याने सकाळी ११ वाजेपासून वाहतुकीची कोंडी होण्यास सुरुवात झाली.
काही नागरिकांनी पोलिसांना दूरध्वनी करून वाहतूक कोंडी सोडविण्याची विंनती केली, परंतु पोलीस तब्बल अडीच तासाने घटनास्थळी पोहोचले. तत्पूर्वी ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गोकूळ लोणे, योगेश आडके, व्यापारी बँकेचे संचालक अरुण जाधव, चंद्रकांत गोडसे, योगेश पाटोळे, प्रमोद मोजाड, वैभव पाळदे, गोकुळ लोणे, प्रशांत धिवंदे, प्रवीण आडके यांसह खिल्लारी इन्फ्रास्टक्चरचे कर्मचाऱ्यांनी रस्त्यांवर उभे राहत तब्बल दोन तास भर उन्हात वाहतूक सुरळीत करण्यास सहाय्य केले.
देवळाली कॅम्प पोलीस दोन तासांनंतर संसरी नाक्यावर तर वाहतूक पोलीस अडीच तासाने पोहोचले तोपर्यंत वाहतूक सुरुळीत झाली
होती.

भर उन्हात नागरिक त्रस्त
वाहनांच्या एकामागोमाग रांगा लागल्या, त्यातच काहींनी आडव्या-तिरपी वाहने दामटण्याचा प्रयत्न केल्याने १२ वाजता संपूर्ण रस्ता पूर्णपणे ठप्प झाले. नागरिकांना भर उन्हात उभे राहावे लागले. संसरी नाका येथे नाशिकरोडकडून पाऊण किलोमीटरपर्यंत तर भगूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर अर्धा किलोमीटरपर्यंत लांबच लांब वाहनांची रांग लागल्याने नागरिक वैतागल्याने त्यांनी कॅन्टोमेंट बोर्ड व पोलीस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Web Title: Three-hour traffic shutdown on the sunshine nose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.