Three henchmen died after overturning truck | ट्रक उलटून ४०० कोंबड्या मृत्युमुखी
ट्रक उलटून ४०० कोंबड्या मृत्युमुखी

नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावर उपनगर नाका येथे मंगळवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास कोंबड्यांची वाहतूक करणारा टाटा कंपनीचा ट्रक उलटून झालेल्या अपघातात ४०० पेक्षा अधिक बॉयलर कोंबड्या मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.
सिन्नर तालुक्यातील वावी येथील पोल्ट्री फार्ममधून ८०० बॉयलर कोंबड्या घेऊन ट्रक (एमएच ०३, सीपी ९९५४) हा बुधवारी (दि.२०) रात्री मुंबईला जाण्यास निघाला. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास उपनगर नाका दर्गा ओलांडून ट्रक काही अंतर पुढे गेला असता एका ट्रॅव्हलच्या लक्झरी बसने कट मारल्याने ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यामुळे ट्रकमधील जवळपास ४०० कोंबड्या मृत्युमुखी पडल्या.
यामुळे महामार्गावरील वाहतूक खोळंबली हाती. अपघातानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले. तत्काळ क्रेनच्या साह्याने उलटलेला ट्रक बाजूला करण्यात आला. मृत्युमुखी पडलेल्या शेकडो कोंबड्या बुधवारी सकाळी मनपाच्या आरोग्य विभागाकडून उचलून भरून कचरा डेपोतील मृत जनावरांच्या विभागात पोहचविण्यात आल्या. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Web Title:  Three henchmen died after overturning truck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.