बीबट्याकडून तीन बकऱ्या फस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 15:48 IST2018-09-17T15:47:04+5:302018-09-17T15:48:24+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याची दहशत सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बीबट्याकडून तीन बकऱ्या फस्त
वरखेडा : दिंडोरी तालुक्यातील चिंचखेड येथे बिबट्याची दहशत सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिंचखेड येथील झेंडफळे वस्ती शिवारात बबन सोनवणे आणि त्यांचे कुटुंब वास्तव्यास आहे, कुटुंबाची स्थिती बिकट असून सोमवारी रात्री सोनवणे यांच्या गायीच्या गोठ्यामध्ये बिबट्याने प्रवेश करून गाईच्या गोठ्यातील वासरू व तीन बकºयांवर हल्ला करून त्या फस्त केल्या आहेत.गोठ्यामध्ये अक्षरश: रक्ताचा सडा पडलेला दिसत होता. वनाधिकाº्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला . सदर चिंचखेड गावामध्ये सहा महिन्यांपासून बिबट्याची दहशत सुरू असून तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वारंवार होणाº्या बिबट्याच्या हल्ल्यामुळे लहान मुले तसेच शालेय विद्यार्थी भीतीने शाळेत जात नाही.यामुळे चिंचखेड येथील मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शेतमजूर देखील या परिसरामध्ये शेतीकामासाठी येत नसल्यामुळे येथील शेतकº्यांनी संताप व्यक्त केला आहे. लवकरात लवकर वनविभागाने चिंचखेड येथील बिबट्याचा वावर असणाºया परिसरात योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी सर्व चिंचखेड ग्रामस्थांनी केली आहे.