शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

बोरगड दुचाकी जाळपोळ प्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:35 IST

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगड परिसरातील भास्कर सोसायटीत झालेल्या दुचाकी जाळपोळ प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.१९) पहाटेच्या सुमाराला काही अज्ञात संशयितांनी तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती.

पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगड परिसरातील भास्कर सोसायटीत झालेल्या दुचाकी जाळपोळ प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.१९) पहाटेच्या सुमाराला काही अज्ञात संशयितांनी तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती.बोरगड परिसरातील भास्कर सोसायटीत भरवस्तीत घडलेल्या दुचाकी जाळण्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच परिसरात दहशत निर्माण व्हावी या हेतूनेच गावगुंडांनीच दुचाकी जाळल्याची चर्चाही पसरली होती. या घटनेमुळे शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकेवर काढत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांसमोर संशयित आरोपींना अटक करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे जाळपोळीचा घटना घडल्यानंतर पोलीस संशयितांच्या मागावर होते. दुचाकी जाळाणाऱ्या संशयितांचा शोध घेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांना म्हसरूळ परिसरातील रहिवासी संशयित आरोपी परेश उर्फ भावड्या दिलीप पाटील (२३), आकाश मोहन इंगळे (१९), नितीन रमेश चतुर (१९) आदींनी वाढणे कॉलनी भास्कर सोसायटीत राहणाºया रितेश लाटे यांची एक्सेस क्रमांक (एमएच १५ जिटी ७४९१), गणेश खैरनार यांची सीडी डीलक्स (एमएच १५ एफपी ८३६१) व रवी लाटे यांची (एमएच १५ सीसी ४९५२) या तीन वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी चारचाकी वाहन तोडफोड व म्हसरूळ भास्कर सोसायटीत दुचाकी वाहनांची जाळपोळ केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र संशयितांनी दुचाकीची जाळपोळ क ा केली याविषयी कोणती स्पष्ट माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकलेली नाही.वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीसदिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोलपंपजवळ ३० ते ४० दिवसांपूर्वी याच संशयितांनी सहा चारचाकी वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी संशयित पाटील, इंगळे व चतुर या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुलमोहरनगर परिसरात चारचाकी वाहनांच्या काचा फोडत नुकसान केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये एक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी