बोरगड दुचाकी जाळपोळ प्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 00:35 IST2019-07-29T00:35:31+5:302019-07-29T00:35:49+5:30
म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगड परिसरातील भास्कर सोसायटीत झालेल्या दुचाकी जाळपोळ प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.१९) पहाटेच्या सुमाराला काही अज्ञात संशयितांनी तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती.

बोरगड दुचाकी जाळपोळ प्रकरणी तिघांना अटक
पंचवटी : म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोरगड परिसरातील भास्कर सोसायटीत झालेल्या दुचाकी जाळपोळ प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे. गेल्या आठवड्यात शुक्रवारी (दि.१९) पहाटेच्या सुमाराला काही अज्ञात संशयितांनी तीन दुचाकी जाळल्याची घटना उघडकीस आली होती.
बोरगड परिसरातील भास्कर सोसायटीत भरवस्तीत घडलेल्या दुचाकी जाळण्याच्या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. तसेच परिसरात दहशत निर्माण व्हावी या हेतूनेच गावगुंडांनीच दुचाकी जाळल्याची चर्चाही पसरली होती. या घटनेमुळे शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा डोकेवर काढत असल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांसमोर संशयित आरोपींना अटक करण्याचे आव्हान निर्माण झाले होते. त्यामुळे जाळपोळीचा घटना घडल्यानंतर पोलीस संशयितांच्या मागावर होते. दुचाकी जाळाणाऱ्या संशयितांचा शोध घेत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सांगळे यांना म्हसरूळ परिसरातील रहिवासी संशयित आरोपी परेश उर्फ भावड्या दिलीप पाटील (२३), आकाश मोहन इंगळे (१९), नितीन रमेश चतुर (१९) आदींनी वाढणे कॉलनी भास्कर सोसायटीत राहणाºया रितेश लाटे यांची एक्सेस क्रमांक (एमएच १५ जिटी ७४९१), गणेश खैरनार यांची सीडी डीलक्स (एमएच १५ एफपी ८३६१) व रवी लाटे यांची (एमएच १५ सीसी ४९५२) या तीन वाहनांची जाळपोळ केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तिघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्यांनी चारचाकी वाहन तोडफोड व म्हसरूळ भास्कर सोसायटीत दुचाकी वाहनांची जाळपोळ केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र संशयितांनी दुचाकीची जाळपोळ क ा केली याविषयी कोणती स्पष्ट माहिती अद्याप पोलिसांना मिळू शकलेली नाही.
वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस
दिंडोरीरोडवरील आकाश पेट्रोलपंपजवळ ३० ते ४० दिवसांपूर्वी याच संशयितांनी सहा चारचाकी वाहनांच्या काचा फोडून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी संशयित पाटील, इंगळे व चतुर या तिघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची चौकशी केली असता त्यांनी गुलमोहरनगर परिसरात चारचाकी वाहनांच्या काचा फोडत नुकसान केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांमध्ये एक जण गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून, त्याच्यावर यापूर्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.