ट्रकमधून साडेतीन लाखांचे खोबरेल तेलाचे बॉक्स चोरीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2021 22:48 IST2021-10-16T22:48:08+5:302021-10-16T22:48:30+5:30
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या मालट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे खोबरेल तेलाचे १२० बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली.

ट्रकमधून साडेतीन लाखांचे खोबरेल तेलाचे बॉक्स चोरीला
सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर उभ्या असलेल्या मालट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपयांचे खोबरेल तेलाचे १२० बॉक्स चोरून नेल्याची घटना घडली.
तामिळनाडू राज्यातून नामक्कल येथून दोन चालकांनी मालट्रक (क्रमांक टी. एन. ८८ एस ई ५३७३) मध्ये केपीएल शुद्ध खोबरेल तेलाचे बॉक्स भरून ते गुजरातकडे घेऊन जात होते. दोन दिवस सलग पाऊस झाल्याने दोन्ही चालक सिन्नरच्या पुढे आल्यानंतर रात्री आरामासाठी थांबले होते. मोहदरी शिवारात स्वाती पेट्रोल पंपासमोर कामक्षी ट्रान्सपोर्टच्या ऑफिसजवळ ट्रक उभा करून दोन्ही चालक केबिनमध्ये झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मालट्रकची ताडपत्री फाडून साडेतीन लाख रुपये किमतीचे खोबरेल तेलाचे १२० बॉक्स घेऊन पोबारा केला.
रात्री एक चालक उठल्यानंतर चोरीचा प्रकार निदर्शनास आला. याप्रकरणी चालक सुब्रमनियम व्यंकटरम (६३), रा. अग्रहराम, नामक्कल (तामिळनाडू) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीची फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार अधिक तपास करीत आहेत.