बनावट हमीपत्राद्वारे साडेतीन कोटी रुपयांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 00:55 IST2020-08-17T00:53:39+5:302020-08-17T00:55:12+5:30
आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमी पत्र व संमती पत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट हमीपत्राद्वारे साडेतीन कोटी रुपयांना गंडा
पंचवटी : आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमी पत्र व संमती पत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयित आरोपींवर आडगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या फसवणूक प्रकरणी इस्लाम इकबाल खान यांनी तक्रार दाखल केली आहे. सिडको येथे राहणाºया संशयित अफजल अख्तर खान, शदात अफजल खान व शफी नूर मोहम्मद खान या तिघांनी संगनमत करून जुलै २०१४ ते डिसेंबर २०१८ या कालावधीत गट नंबर ६७० सर्वे नंबर १४१ आडगाव शिवारात असलेल्या फिर्यादीच्या मिळकतीच्या विकास करार नाम्यावर फिर्यादी व त्याचे वडील यांना रस्ता भूसंपादन माध्यमातून मिळणाºया साडेतीन कोटी रुपयांची रक्कम स्वीकारून खोटे दस्तऐवज संमती पत्र तयार केले व बांधकाम विकास आराखड्यात बेकायदेशीरपणे बदल करून फसवणूक केली. सदर बाब लक्षात येताच त्यांनी आडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली