साडेतीन कोटी रुपयांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:07 IST2020-08-17T21:28:00+5:302020-08-18T01:07:35+5:30

नाशिक : आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमीपत्र व संमतीपत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयितांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Three and a half crore rupees | साडेतीन कोटी रुपयांना गंडा

साडेतीन कोटी रुपयांना गंडा

ठळक मुद्देया प्रकरणी इस्लाम इकबाल खान यांनी तक्रार दाखल केली आहे.

नाशिक : आडगाव शिवारात असलेल्या जमिनीचे खोटे हमीपत्र व संमतीपत्र बनवून तसेच बांधकाम विकास आराखडा बेकायदेशीर बनवून सुमारे तीन कोटी ४८ लाख ९० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी सिडकोत राहणाऱ्या तिघा संशयितांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी इस्लाम इकबाल खान यांनी तक्रार दाखल केली आहे. सिडको येथे राहणाºया संशयित अफजल अख्तर खान, शदात अफजल खान व शफी नूर मोहम्मद खान या तिघांनी संगनमत करून फिर्यादीच्या मिळकतीच्या विकास करारनाम्यावर फिर्यादी व त्याचे वडील यांना रस्ता भूसंपादन माध्यमातून मिळणाºया साडेतीन कोटी रुपयांची रक्कम स्वीकारून खोटे दस्तऐवज संमती पत्र तयार केले.

Web Title: Three and a half crore rupees