गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 01:31 IST2019-02-15T01:30:44+5:302019-02-15T01:31:36+5:30

शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.

Three accused in the murder case of gangrape | गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत

गांडूळे खून प्रकरणी तिघे अटकेत

सिडको : शुभम पार्कयेथील खून प्रकरणात पोलिसांनी संशयावरून अजून तीन संशयितांना अटक केली आहे. त्यामधील एक सराईत गुन्हेगार असून, न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या शुक्रवार दि. ८ फेब्रुवारी रोजी शुभम पार्क परिसरात वैभव गांडूळे याचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. या प्रकरणात दोन मुख्य आरोपींना अंबड पोलिसांनी सापळा रचून द्वारका येथे अटक केली होती. याच प्रकरणातील आणखीन तीन आरोपींना आज अटक करण्यात आली. त्यांना अंबड परिसरातून ताब्यात घेण्यात आले. यात संशयित आरोपींमध्ये शुभम राजेंद्र येवले (१९, रा. पवननगर) भूषण ऊर्फ सागर ऊर्फ फिंगर विलास एखंडे, कुंदन सोमनाथ खैरनार (२०, रा. अंबड) यातील कुंदन खैरनार हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर नाशिक आयुक्तालयात विविध गुन्हे दाखल आहेत. या तीनही आरोपींना न्यायालयात हजार केले असता त्यांना १७ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Web Title: Three accused in the murder case of gangrape