सातपूरमध्ये व्यापाऱ्याला  जिवे ठार मारण्याची धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2019 01:09 IST2019-02-23T01:09:00+5:302019-02-23T01:09:29+5:30

सातपूर येथील अशोकनगर परिसरातील दुकानदार नरेश किसनचंद अग्रवाल (६२) यांना त्यांच्याच शेजारच्या दुचाकी गॅरेजचालक बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) घडला.

 Threatens to kill a trader in Satpur | सातपूरमध्ये व्यापाऱ्याला  जिवे ठार मारण्याची धमकी

सातपूरमध्ये व्यापाऱ्याला  जिवे ठार मारण्याची धमकी

नाशिक : सातपूर येथील अशोकनगर परिसरातील दुकानदार नरेश किसनचंद अग्रवाल (६२) यांना त्यांच्याच शेजारच्या दुचाकी गॅरेजचालक बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी किरकोळ कारणावरून झालेल्या वादात जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी (दि.२२) घडला. या प्रकारानंतर पीडित नरेश अग्रवाल यांनी सातपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, पोलिसांनी संशयित आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.
सातपूरच्या समृद्धनगर येथील रहिवासी नरेश अग्रवाल यांचे अशोकनगर परिसरात दुकान आहे. याच ठिकाणी असलेल्या दुचाकी गॅरेजवाल्यांच्या गाड्या रस्त्यात उभ्या असतात. त्यामुळे नरेश अग्रवाल यांना येण्या-जाण्यासाठी अडचण होत असल्याने ते दुचाकी गॅरेजचालकांना रस्त्यात गाड्या उभ्या करून नका, असे समजाविण्यासाठी गेले होते. याचा राग येऊन अशोकनगर येथील रहिवासी बापू युवराज पाटील व अमोल पाटील यांनी नरेश अग्रवाल यांना शिवीगाळ करून दमदाटी करतानाच तुम्हास मारून टाकीन तसेच गाडीही जाळून टाकील, असा दम दिला.
त्याचप्रमाणे सशयितांमधील आरोपी बापू युवराज पाटील याने दुकानाची काच फोडून नुकसानही केल्याची फिर्याद नरेश अग्रवाल यांनी फिर्याद नोंदविली असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सातपूर पोलीस ठाण्यात संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title:  Threatens to kill a trader in Satpur