चांदवडच्या विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 00:23 IST2018-04-18T00:23:14+5:302018-04-18T00:23:14+5:30
चांदवड : माहेरहून मेडिकल एजन्सीसाठी वीस लाख रुपये आणावेत म्हणून चांदवड येथील विवाहितेचा सासरच्यांनी शारीरिक व मानसिक छळ केला. उपाशीपोटी ठेवून मारहाण केली, अशा आशयाची फिर्याद विवाहितेने चांदवड न्यायालयात दिली. न्यायालयाच्या आदेशाने चांदवड पोलिसांत सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

चांदवड येथील विवाहिता योगिनी ऊर्फ यशोदा पुष्कर तिळवणकर हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वडील मधुकर यशंवत वासूळकर व भाऊ तुषार वासूळकर यांनी दि. १२ जून २०१५ रोजी थाटामाटात विवाह करून दिला. पती पुष्कर गजानन तिळवणकर यांचा औरंगाबाद येथे मेडिकल व्यवसाय आहे. माहेरून वीस लाख रुपये मेडिसिन एजन्सीसाठी आण नाहीतर नांदवणार नाहीतर तुझा खून करू, असा दम देत असत.सहाजणांविरुद्ध गुन्हाऔरंगाबाद येथे नांदत असताना सासरे गजानन काशीनाथ तिळवणकर, सासू निता गजानन तिळवणकर, जनाबार्ई काशीनाथ तिळवणकर, रूपेश चंद्रकांत तिळवणकर, प्रदीप बळवंत दुसाणे यांनी तुझ्या आईवडिलांनी संसारोपयोगी वस्तू, भांडीकुंडी व फर्निचर दिले नाही यावरून पती पुष्कर तिळवणकर हा नेहमी दारू पिऊन मारहाण करीत असे, अशी फिर्याद यशोदा पुष्कर तिळवणकर हिने दिली आहे.