शिवराज्याभिषेक सोहळ्यास हजारो शिवप्रेमी जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 00:26 IST2018-06-02T00:26:02+5:302018-06-02T00:26:02+5:30

दुर्गराज रायगडावर बुधवारी (दि.६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक समितीने पत्रकार परिषदेत दिली.

 Thousands of pilgrims go to Shivrajyabhishek's celebrations | शिवराज्याभिषेक सोहळ्यास हजारो शिवप्रेमी जाणार

शिवराज्याभिषेक सोहळ्यास हजारो शिवप्रेमी जाणार

सातपूर : दुर्गराज रायगडावर बुधवारी (दि.६) होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यास जिल्ह्यातून हजारो शिवप्रेमी उपस्थित राहाणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक समितीने पत्रकार परिषदेत दिली.  nशिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष युवराज छत्रपती खासदार संभाजीराजे भोसले आणि बाळराजे युवराज शहाजी राजे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्वराज्याचे स्फुल्ंिलग चेतविणाºया छत्रपती शिवाजी राजे यांचा ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्रच नव्हे देश-विदेशांतील शिवप्रेमी ‘एकच धून सहा जून’ हे ब्रिद घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. नाशिक जिल्ह्यातील शिवप्रेमीदेखील सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती सोहळा समितीचे सदस्य करण गायकर सातपूर विभाग समितीचे बाळा निगळ यांनी दिली. यावेळी गणेश कदम, तुषार जगताप, शिवाजी मोरे, अमोल वाजे, नवनाथ शिंदे, ज्ञानेश्वर थोरात, विजय खर्जुल, विलास जाधव, जितेंद्र चव्हाण यांच्यासह असंख्य शिवभक्त उपस्थित होते. या सोहळ्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि.५) युवराज संभाजी राजे यांच्या प्रेरणेने दुर्गराज स्वच्छता मोहीम राबविली जाणार असल्याने प्रत्येक शिवभक्तांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन सोहळा समितीने केले आहे.

Web Title:  Thousands of pilgrims go to Shivrajyabhishek's celebrations

टॅग्स :Nashikनाशिक