सिडको भागात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:17 IST2018-10-29T00:17:30+5:302018-10-29T00:17:57+5:30
मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे नागरी भागात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

सिडको भागात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय
सिडको : मनपाच्या पाणीपुरवठा विभागाच्या गलथान व नियोजनशून्य कारभारामुळे नागरी भागात हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रविवार (दि.२८) रोजी पवननगर परिसरातील सूर्यनारायण चौक व त्यालगतच्या परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात हजारो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर वाया गेल्याची घटना घडली. यामुळे नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सिडकोतील सूर्यनारायण चौक व त्यालगतच्या परिसरात सकाळी सुरू झालेला पाणीपुरवठा तब्बल दुपारपर्यंत सुरू असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्यांवरून वाहिले. या संदर्भात स्थानिक रहिवाशांनी तक्र ारही केली मात्र रविवार असल्याने त्यांच्या तक्र ारींची दखल घेतली गेली नाही. एकीकडे मनपा प्रशासन पाण्याचा यत्किंचितही अपव्यय केला तर नागरिकांवर कारवाई करते मात्र दुसरीकडे मनपाच्याच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चुकीने हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून, यास मनपा प्रशासनच जबाबदार असल्याचे बोलले जात आहे.