‘ओटीपी’ची माहिती घेऊन ८९ हजारांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 01:28 IST2019-09-28T01:28:37+5:302019-09-28T01:28:52+5:30
कामटवाडा येथील धन्वंतरी मेडिकल कॉलेजजवळील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

‘ओटीपी’ची माहिती घेऊन ८९ हजारांची फसवणूक
नाशिक : कामटवाडा येथील धन्वंतरी मेडिकल कॉलेजजवळील राहणाऱ्या एका व्यक्तीच्या युनियन बँक आॅफ इंडियाच्या खात्याशी संलग्न डेबीट कार्डविषयी फोनवरून गोपनीय माहिती विचारून तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने कामडवाडा येथील भगवान पोपटराव बिरारी (५२) यांना २१ ते २३ असे सलग तीन दिवस फोन करून आपण स्टेट बँक आॅफ इंडियातून बोलत असल्याचे सांगत त्यांच्या युनियन बँकेच्या डेबीट कार्डची गोपनीय माहिती घेऊ न टप्प्या टप्प्याने पैसे काढून तीन दिवसांत तब्बल ७८ हजार ९०७ रुपयांची फसवणूक केली. विशेष म्हणजे बिरारी यांचे खाते युनियन बँक आॅफ इंडियाचे आहे, तर फोन कराणारा अज्ञात स्टेट बँकेतून बोलत असल्याचे सांगत बिरारी यांच्या डेबीट कार्ड सुरक्षितेतेविषयीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन गोपनीय माहिती विचारत होता. असे असतानाही बिरारी यांनी त्यांना सलग तीन दिवस अज्ञात व्यक्तींना फोनवरून गोपनीय माहिती सांगितल्याने हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.