उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 13:48 IST2019-04-14T13:47:58+5:302019-04-14T13:48:57+5:30
ओझर : येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे...
ओझर : येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. गावातील वीर तानाजी चौक, इंदिरा गांधी चौक, गाडेकर वाडी, शेजवळवाडी, ग्रामपंचायत,भीमगर्जना नगर,भगतिसंग नगर,पंचशील नगर आदी ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले. प्रारंभी सकाळी राजवाडा येथील ऐतिहासिक बुद्ध विहारात मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करून गौतम बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केले. यावेळी यतीन कदम,प्रकाश महाले,दीपक जाधव,प्रशांत अक्कर,प्रदीप अहिरे,विनोद विधाते यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी नितीन काळे, सागर शेजवळ, प्रवीण जाधव, परेश जाधव, आनंद जाधव, राकेश जाधव, रूपेश जाधव, चेतन जाधव, अजित जाधव, कुणाल जाधव,मनोज जाधव, हरिभाऊ जाधव, बाळासाहेब जाधव, धर्मेंद्र जाधव, अमित जाधव, शामराव जाधव, स्वप्निल केदारे आदी उपस्थित होते.