शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

सरकारविरोधी हजारो लाल सैनिकांचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 1:46 AM

दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठण्याच्या तयारीत आहे.

नाशिक : दुष्काळग्रस्तांच्या शेतीला पाणी पुरवा, महाराष्टÑाचे पाणी गुजरातला जाऊ देऊ नका, वनहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी विनाअट जाहीर करा, या प्रमुख मागण्या घेऊन पुन्हा एकदा वर्षभरानंतर नाशकातून मुंबईच्या दिशेने ‘लाल वादळ’ उठण्याच्या तयारीत आहे. यासाठी बुधवारी (दि.२०) दिवसभरात राज्यातील विविध जिल्ह्यांमधून हजारोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी नाशिक मुक्कामी आहेत.शासकीय विश्रामगृहातील शिवनेरी दालनात जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत किसान सभेचे राष्टÑीय अध्यक्ष अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, राज्य सरचिटणीस डॉ. अजित नवले यांच्या शिष्टमंडळाने तब्बल अडीच तास चर्चा केली. किसानसभेकडून महाजन यांना मागण्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत निवेदन देण्यात आले. मात्र, ही चर्चा निष्फळ ठरली. जोपर्यंत शासनाकडून लेखीस्वरूपात ठोस आश्वासन दिले जात नाही तोपर्यंत लॉँग मार्च रद्द केला जाणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. त्यामुळे गुरुवारी (दि.२०) सकाळी ९.३० वाजता नाशिकवरून मुंबईच्या दिशेने ‘लॉँग मार्च’ निघणार असल्याचे किसान सभेने स्पष्ट केले.वर्षभरापूर्वी नाशिकवरून मुंबईत हजारो ते लाखोंच्या संख्येने शेतकरी, आदिवासी कष्टकºयांनी पायी धडक देत फडणवीस सरकारकडे विविध मागण्यांचे गाºहाणे मांडले होते; मात्र वर्ष उलटूनदेखील त्या मागण्या पूर्ण झाल्या नसल्याने पुन्हा एकदा महाराष्टतील शेतकरी, आदिवासी बांधव अखिल भारतीय किसान सभेने दिलेल्या ‘लॉँग मार्च’च्या हाकेला प्रतिसाद देत रस्त्यावर उतरलेआहेत. आठवडाभरात हजारोंच्या संख्येने आंदोलक विधानसभेला घेराव करणार असल्याचे सांगण्यात आले. लॉँग मोर्चाचे नेतृत्व डॉ. अशोक ढवळे, आमदार जिवा पांडू गावित, डॉ. अजित नवले, किसन गुजर आदि नेते करीत आहेत.किसानसभेच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली असून, त्यांच्या मागण्यांबाबत सरकार नक्की विचार करेल. शेतकºयांची कुठल्याही प्रकारे पायपीट होऊ देणार नाही. शिष्टमंडळाच्या मागणीनुसार सरकारकडून सकाळी लेखी स्वरूपात आश्वासनांची हमी दिली जाईल.- गिरीश महाजन, जलसंपदामंत्रीसरकारने शेतकºयांचा विश्वासघात करत गद्दारी केली. वर्ष उलटले तरी मागण्या मान्य केल्या नाही आणि याचा जाब विचारण्यासाठी किसान सभेने लॉँग मार्च जाहीर केला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधिकाराचा गैरवापर करून पोलीस प्रशासनामार्फत दडपशाही केली. मोर्चासाठी नाशिकला येणारी लाल बावटा असलेली वाहने रोखून धरली. गुरुवारी हा लॉँग मार्च संपूर्ण ताकदीने मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे.- डॉ. अजित नवले, राज्य सरचिटणीस, किसान सभाशेतकºयांनी वर्षभरापूर्वी केलेल्या पायपिटीकडे या असंवेदनशील सरकारने दुर्लक्ष करीत त्यांच्या तोंडाला पाने पुसली. हे सरकार विश्वासघातकी व केवळ आश्वासनांची खैरात करणारे आहे. यामुळे पुन्हा त्या मागण्यांचा जाब विचारण्यासाठी मुंबईत विधानसभेला शेतकरी घेराव घालणार आहे. किसान सभेने पुकारलेला हा एल्गार संपूर्ण राज्यातील गोरगरीब शेतकरी, शेतमजूर आदिवासींचा आवाज आहे, हे सरकारने विसरू नये. लाखोंच्या संख्येने मोर्चेकरी धडक देणार आहे.- जिवा पांडू गावित, आमदारअशा आहेत मागण्या...च्शेतकºयांचे संपूर्ण कर्ज विनाअट माफ करून स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्या.च्ठाणे-पालघर, नाशिक जिल्ह्णासह राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या शेतीला पाणी द्या.च्नार-पार, दमणगंगा, वाघ व पिंजाळ नद्यांचे अरबी समुद्रात वाहून जाणारे पाणी अडवा अन गिरणा-गोदावरी खोºयात वळवा.हाराष्टचे पाणी गुजरातला कुठल्याही अटीवर देता कामा नये.जरातला धरण अन् आदिवासीला मरण नको.२००६ वनाधिकार कायदा डाव्या पक्षांच्या दबावाखाली केंद्राने पारित केला. २००८ साली नियमावली.च्ठाणे, पालघर जिल्ह्यातील सूर्या, धामणी, कुर्झे, तानसा, वैतरणा, भातसा व अन्य धरणांचे पाणी अग्रक्रमाने या जिल्ह्यांमधील जनतेला पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी उपलब्ध करून द्यावे.च्शिधापत्रिकाधारकांना नव्या शिधापत्रिका द्या, पुरेसे मुबलक प्रमाणात गोरगरिबांना शिधापुरवठा करावा.

टॅग्स :Kisan Sabha Long Marchकिसान सभा लाँग मार्चnashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालय