नाशिकमध्ये भर दिवसा युवकाचा खून करणाऱ्यांना 12 तासांत अटक; तीन जणांना घातल्या बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 10:13 AM2023-08-18T10:13:17+5:302023-08-18T10:13:38+5:30

जव्हार- मोखाडा येथे आवळल्या मुसक्या

Those who killed a youth in broad daylight in Nashik arrested within 12 hours; Three people were shackled | नाशिकमध्ये भर दिवसा युवकाचा खून करणाऱ्यांना 12 तासांत अटक; तीन जणांना घातल्या बेड्या

नाशिकमध्ये भर दिवसा युवकाचा खून करणाऱ्यांना 12 तासांत अटक; तीन जणांना घातल्या बेड्या

googlenewsNext

नरेंद्र दंडगव्हाळ

नाशिक  : शहरातील अंबड येथे काल दुपारी  मयूर दातीर या युवकावर चॉपरीने पोटावर आणि छातीवर सपासप  वार करून हत्या झाली होती. दातीर याच्यावर हल्ला करून फरार झालेल्या हल्लेखोरांना अवघ्या 12 तासांत पोलिसांनी मोखाडा येथून अटक केली आहे.

अंबड पोलीस ठाणे आणि नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या एकत्रित टीमने जव्हार -मोखाडा येथे शोध घेऊन त्यांच्या मुस्क्या आवळ्या आहेत. सराईत गुन्हेगार करण अण्णा कडूसकर (वय 21), मुकेश अनिल मगर ( वय 25 ),रवींद्र शांताराम अहेर (वय 20 ) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.

संशयित गुन्हेगार करण कडुस्कर व त्यांच्या दोन्ही  साथीदारांनी काल (दि.17) भर दुपारी दोन वाजेच्या सुमारासमयूर दातीर याची हत्या केली होती. यामुळे संतप्त झालेल्या अंबड येथील रहिवाशांनी  गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अंबडगाव येथून अंबड पोलीस स्टेशन पर्यंत पायी मोर्चा काळात पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.  आरोपींना अटक होई पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा   नागरिकांनी घेतला होता. मात्र,  ग्रामस्थांची पोलिसांनी समजूत काढली होती.

Web Title: Those who killed a youth in broad daylight in Nashik arrested within 12 hours; Three people were shackled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.