'हेच खरे गद्दार...', संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 09:48 IST2023-03-29T09:48:30+5:302023-03-29T09:48:50+5:30

'बघा हेच खरे गद्दार ज्यांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली', असा मजकूर पोस्टरवर आहे.

'This is the real traitor...' poster campaign in Nashik against Sanjay Raut | 'हेच खरे गद्दार...', संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजी

'हेच खरे गद्दार...', संजय राऊतांविरोधात नाशिकमध्ये पोस्टरबाजी

- राजू ठाकरे 

नाशिक :  काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्यानंतर त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी त्यांना नाशिकमधील मालेगाव येथील सभेत सुनावले असले तरी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत हे मात्र  राहुल गांधी यांच्या गळ्यात गळ्यात घालून फिरत असल्याचे पोस्टर आज नाशिक शहरातील रविवार कारंजा या ठिकाणी लावण्यात आला.

'बघा हेच खरे गद्दार ज्यांनी आदरणीय शिवसेना प्रमुखांच्या विचारांशी आणि हिंदुत्वाशी गद्दारी केली', असा मजकूर पोस्टरवर आहे. दरम्यान, राहुल गांधी यांनी सावरकर यांच्या विरोधात विधान केल्याने त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शिवसेना म्हणजे शिंदे गटातील युवा सेनेने आम्ही सारे सावरकर या शिर्षकाखाली खासदार संजय राऊत गद्दार असल्याचे पोस्टर लावला आहे.

जेव्हा सावरकरांचा अपमान झाला तेव्हा बाळासाहेबांनी स्वतः रस्त्यावर उतरून निषेध केला होता. राहुल गांधी वारंवार सावरकरांचा अपमान करतात तेव्हा संजय राऊत हे त्यांच्या गळ्यात गळे घालून फिरतात, असे त्यात नमूद आहे.

Web Title: 'This is the real traitor...' poster campaign in Nashik against Sanjay Raut

टॅग्स :Nashikनाशिक