शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

दरेगावच्या खव्याला दीडशे वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2019 10:32 PM

प्रत्येक गावाला एक परंपरा, स्वत:ची वेगळी ओळख असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होणाऱ्या बदलात परंपरा विशेष ओळख टिकवून ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मात्र सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील ग्रामस्थांनी दीडशे वर्षांपूर्वीची खवा तयार करण्याची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.

ठळक मुद्देकोणतीही रासायनिक प्रक्रिया न करता बनविण्याची पद्धतपसंती : परिसरात मागणी

प्रवीण दोशी। लोकमत न्यूज नेटवर्कवणी : प्रत्येक गावाला एक परंपरा, स्वत:ची वेगळी ओळख असते. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात झपाट्याने होणाऱ्या बदलात परंपरा विशेष ओळख टिकवून ठेवणे अवघड होऊन बसले आहे. मात्र सप्तशृंगीगडाच्या पायथ्याशी असलेल्या दरेगाव येथील ग्रामस्थांनी दीडशे वर्षांपूर्वीची खवा तयार करण्याची परंपरा आजही टिकवून ठेवली आहे.गडावर येणाºया राज्यभरातील भाविकांकडून या खव्याला पसंती दिली जाते आहे. कोणतीही रासायनिक प्रक्रि या न करता स्वादिष्ट खवा बनविणाºया दरेगाववासीयांच्या खव्याने सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे. दिंडोरी व कळवण तालुक्याच्या सीमेलगत असणारे दरेगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून खवा बनविण्याची परंपरा आहे. गावातील गवळी समाजाचा हा प्रमुख व्यवसाय आहे.दरेगावच्या खव्याला कळवण सप्तशृंगीगडासह नाशिक जिल्ह्यात मागणी आहे. पेढे व विविध प्रकारच्या मिठाईमध्ये खव्याचा वापर मोठ्या प्रमाणावर करण्यात येत असल्याने दुकानदारही येथील खव्याला पसंती देतात.गाईच्या पाच लिटर दुधापासून तर म्हशीच्या चार लिटर दुधापासून एक किलो खवा तयार करण्यात येतो. दूध तापवून आटवून त्याचा खवा तयार केला जातो. पूर्वी दूध आटविण्यासाठी लाकडी भट्टीचा वापर केला जायचा. आता मात्र चुलीवर दूध आटवले जाते. अपवादात्मक स्थितीत आजही काही घटक पारंपरिक पद्धतीचा वापरकरत असल्याची माहिती देण्यात आली.खव्याच्या प्रतवारीनुसार दोनशे रु पये किलोला दर मिळतो. वास्तविक दुधाच्या दराच्या तुलनेत हा दर खवा तयार करणाऱ्यांना परवडणारा नाही; मात्र पारंपरिक व्यवसाय टिकविण्यासाठी पर्यायी व्यवसाय म्हणून याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यामागे आहे.जुलै ते डिसेंबरदरम्यान गाई व म्हशीसाठी मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असल्याने या काळात दूध उत्पादनात वाढ होत असल्याने खवा तयार करण्याचे सर्वाधिक प्रमाण या कालावधीत असते. तासन्तास भट्टीसमोर बसून दर्जेदार खवा तयार करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. कळवण तालुक्यातील दरेगाव, मोहनदरी, नांदुरी, कातळगाव या परिसरात खवा तयार करण्याचा व्यवसाय केला जातो.दरेगावच्या खव्याच्या तुलनेत इतरांचे प्रमाण नगण्य आहे. सागाच्या व पळसाच्या पानांमध्ये किरकोळ विक्रे ते एक किलोपासून पाच किलोपर्यंत खवा ठेवण्यात येतो. अर्धा ते एक किलो आकारमानाचे खव्याचे गोळे असलेली ही पाने भांड्यात ठेवून गावोगावी त्याची विक्र ी केली जाते. किरकोळ विक्र ेत्याची पद्धत तर घाऊक विक्रे ते मोठ्या भांड्यांमधून खवा घेऊन त्याची इच्छित ठिकाणी वाहतूक करून विक्र ी करतात.

टॅग्स :Nashikनाशिकmilkदूध