शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

बोराळे गावावर आता तिसऱ्या डोळ्याची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2020 02:22 IST

नांदगाव : विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते. बोराळे गावातले सीसीटीव्ही कॅमेरे आज गावची दृष्टी बनले आहे. त्यांच्या साहाय्याने गावातला कानाकोपरा २४ तास नजरेखाली आला आहे. जणू गावालाच डोळे आले आहे.

नांदगाव : विकासाचा आदर्श समोर असला तर तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘नवदृष्टी’ साकार करता येते. बोराळे गावातले सीसीटीव्ही कॅमेरे आज गावची दृष्टी बनले आहे. त्यांच्या साहाय्याने गावातला कानाकोपरा २४ तास नजरेखाली आला आहे. जणू गावालाच डोळे आले आहे. यापुढे कोणतेही गैरकृत्य लपणार नाही व चांगले काम दिसल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात सरपंच अश्विनी पवार व ग्रामसेवक मिलिंद सोनवणे यांनी आनंद व्यक्त केला. एरव्ही गावात निवडणुका आल्या की राजकीत स्पर्धा सुरू होते. आरोपांच्या फैरी झाडल्या जातात. मात्र ती संपली की, गटातटाचे राजकारण बाजूला सारून गावाचा विकास कसा करायचा, याचा आदर्श बोराळे ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेल्या विकासकामांच्या माध्यमातून दाखवून दिला आहे. जिल्ह्याच्या आणि तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेली नांदगाव तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायत विकासात्मक धोरणे राबवत विकासाकडे पाउल टाकताना दिसत आहे.आता बोराळे ग्रामपंचायतीने २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या चौदाव्या वित्त आयोगाचा योग्य वापर करत गावात सीसीटीव्ही बसवले. एकूण २९ ठिकाणी कॅमेरे बसवण्यात आले आहेत. गावातील प्रत्येक हालचालीवर आता त्यांचे लक्ष असणार आहे.प्रामुख्याने होळी मैदान, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, वाटर एटीएम, मारु ती मंदिर, राजवाडा, देवरे गल्ली, वाटर टॅँक, मुख्य गल्ली, आदिवासी वस्ती, बस स्टॉप, अमोदे रोड, वेहेळगाव रोड, गिरणेश्वर मंदिर, जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वर्गखोल्यांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. यासाठी ५ लाख १७ हजार रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे.चोरावर यापुढे असणार सक्त नजर.लपणार नाहीत राजकीय हालचाली.पारावरची मंडळी येणार कॅमेºयात.पारदर्शक होणार ग्रामपंचायत कारभार.

टॅग्स :Nashikनाशिक