व्यापाऱ्याच्या ५०० द्राक्ष क्रेटसवर चोरट्यांचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2022 23:46 IST2022-03-17T23:45:52+5:302022-03-17T23:46:55+5:30
पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या सचिन मोरे यांच्या निवासस्थानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५०० क्रेटसवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्यापाऱ्याच्या ५०० द्राक्ष क्रेटसवर चोरट्यांचा डल्ला
पिंपळगाव बसवंत : शहरातील शास्त्री नगर परिसरात राहणाऱ्या सचिन मोरे यांच्या निवासस्थानातून अज्ञात चोरट्यांनी तब्बल ५०० क्रेटसवर डल्ला मारून पोबारा केल्याची घटना पिंपळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. याबाबत पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फारुक अहमद लाल मोहम्मद (वय ४९) मूळगाव इलाहाबाद, उत्तर प्रदेश. हल्ली मुक्काम शास्त्रीनगर पिंपळगाव येथे सचिन मोरे यांच्या निवासस्थानी राहतात. त्यांनी व्यापार करण्याच्या हेतूने ५० हजार किमतीचे १३०० प्लास्टिक क्रेटस् घेतले होते. ते शास्त्रीनगर येथे राहत्या ठिकाणी ठेवले होते. मात्र, त्यापैकी तब्बल ५०० क्रेटस् अज्ञात चोरट्यांनी लांबवले आहे. पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पठारे यांनी घटनास्थळाला भेट देऊन माहिती घेतली. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार रामदास गांगुर्डे, राकेश धोंगडे करत आहेत.