शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नाशिककरांच्या दारांमधून चोरट्यांनी पळविल्या दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 18:34 IST

शहर व परिसरात रहिवासी अपार्टमेंटच्या वाहनतळातून सर्रासपणे महागड्या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी पुन्हा सुरू करत पोलिसांना आव्हान दिले आहे.

ठळक मुद्देराहत्या घराच्या आवारातही दुचाकी असुरक्षित

नाशिक : शहरात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच असून विविध भागांमधून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपये किंमतीच्या पाच दुचाकी गायब केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी भद्रकाली, सरकारवाडा, इंदिरानगर, अंबड पोलीस ठाण्यांमध्ये संबंधित दुचाकीमालकांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.मेनरोडवरील बिवलकर लेनमध्ये राहणारे चंद्रभान राजाराम विश्वकर्मा (३५,रा.बिवलकर लेन) यांनी त्यांची पॅशन-प्रो दुचाकी (एम.एच.१५ईडी ४९६२) त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या वाहनतळात उभी केली होती. तरीदेखील चोरट्यांनी रात्रीतून २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी गायब केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच दुसरी घटनाही सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दीतील जिल्हा रूग्णालयाच्या वाहनतळात घडली. वाहनतळा फिर्यादी अनंत टी. गायकवाड यांनी त्यांची १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी उभी केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी (एम.एच.४१ वाय ४५९२) अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्याप्रमाणे भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीत मनपाच्या जिजामाता रूग्णालयाच्या पाठीमागील बाजूने आशिषकुमार रमेशराव वराडे (४२,रा.तांबे मळा, मखमलाबादरोड, पंचवटी) यांची दुचाकी (एम.एच.१५ बीएल ९९७५) अज्ञात चोरट्याने भरदिवसा चोरून नेली. त्यांच्या फिर्यादीवरून भद्रकाली पोलीस ठाण्यात १५ हजारांची दुचाकी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तसेच इंदिरानगर पोलीस ठाणे हद्दीतील पाथर्डी गावातील सरगम अपार्टमेंटच्या वाहनतळातून मिलिंद श्यामकुमार मडगुंडी (२४) यांच्या मालकीची ५० हजार रूपये किंमतीची केटीएम दुचाकी (एम.एच १५ जीक्यू ४३४१) अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याची घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीतील माऊली चौक, दत्तनगर येथून आपसिंग वसावे (३२) यांची यामाहा-आर१५ ही दुचाकी (एम.एच१५ जीएस७७६६) त्यांनी त्यांच्या राहत्या अपार्टमेंटच्या वाहनतळात व्यवस्थित लॉक करून ठेवली असतानाही अज्ञात चोरट्यांनी ती लांबविली. याप्रकरणी त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.राहत्या घराच्या आवारातही दुचाकी असुरक्षितनाशिककरांच्या राहत्या घराच्या आवारातील वाहनतळातदेखील त्यांची वाहने सुरक्षित राहत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. शहर व परिसरात रहिवासी अपार्टमेंटच्या वाहनतळातून सर्रासपणे महागड्या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी पुन्हा सुरू करत पोलिसांना आव्हान दिले आहे. केटीएम, यामाहा, अव्हेंजर यांसारख्या स्पोर्टी लूकच्या बाइकवर चोरट्यांनी वक्रदृष्टी केली आहे.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयtheftचोरीbikeबाईक