पीपीई सूट घालून चोरट्यांनी फोडले ज्वेलरी शॉप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 19:59 IST2020-08-13T19:53:27+5:302020-08-13T19:59:59+5:30

नाशिक : शहर व परिसरातील बॅँका, सराफी दुकाने, गुदामे चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवरील ...

Thieves broke into a jewelery shop wearing PPE suits | पीपीई सूट घालून चोरट्यांनी फोडले ज्वेलरी शॉप

पीपीई सूट घालून चोरट्यांनी फोडले ज्वेलरी शॉप

ठळक मुद्देसुदैवाने दोन्ही दुकानातून काहीही चोरी झाले नाहीग्रील कापले, सीसीटीव्ही फोडले

नाशिक : शहर व परिसरातील बॅँका, सराफी दुकाने, गुदामे चोरट्यांकडून लक्ष्य केले जात आहे. भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील टाकळीरोडवरील मोहिनीराज ज्वेलर्स हे दुकान गुरुवारी (दि.१३) सकाळी सहा वाजेच्या सुमारास दोघा चोरट्यांनी मोटारीतून पीपीई सूट घालून येत दुकानाच्या संरक्षणासाठी लावलेले लोखंडी ग्रील तोडले. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून दुकानात प्रवेश केला; मात्र लॉकर फोडता आले नाही आणि रस्त्यांवर नागरिकांचा वावर असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरटे फरार झाले. अशाच पध्दतीने चोरट्यांनी पहाटेच्या सुमारास जेलरोडवरील एक सराफी दुकानही फोडल्याचे उघडकीस आले आहे. सुदैवाने दोन्ही दुकानातून काहीही चोरी झाले नाही.

गुरूवारी पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी टाकळीरोडवरील मोहिनीराज ज्वेलर्सच्या दुकानापुढे एक कार उभी करत ज्वेलर्सच्या दुकानाचे ग्रील कापून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी शटर उचकटून आतमध्ये प्रवेश केला. यावेळी चोरट्यांनी दुकानातील लॉकरदेखील फोडण्याचा प्रयत्न केला; मात्र लॉकर फोडणे त्यांना शक्य झाले नाही. दिवस उगविल्यामुळे रस्त्यांवर नागरिकांची ये-जा सुरू झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तत्काळ दुकानातून बाहेर येत कारमधून पोबारा केला. सकाळी दहा वाजेच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी मालक नेहमीप्रमाणे आले असता त्यांना ग्रील तुटलेले दिसल्याने दुकानफोडी झाल्याचा संशय आला. तत्काळ त्यांनी भद्रकाली पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरिक्षक साजन सोनवणे हे पोलीस फौजफाट्यासह दाखल झाले. तत्काळ पंचनामा करत सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करुन त्याअधारे चोरट्यांचा शोध सुरू केला. या दुकानफोडीच्या प्रयत्नात सुदैवाने दागिणे, रक्कम सुरक्षित राहिली. याप्रकरणी दुकानमालक सचिन वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

ग्रील कापले, सीसीटीव्ही फोडले
जेलरोड येथील त्रिवेणी पार्कमध्ये हर्षल प्रकाश बाबर यांच्या मालकीचे तेजस्वी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. बाबर यांना सकाळी त्यांच्या शेजारच्या दुकानमालकाने त्यांना फोनवरून दुकानाच्या ग्रीलच्या लोखंडी पट्ट्या कापलेल्या दिसून आल्या. तसेच दोन सीसीटीव्ही कॅमेरेही तुटलेल्या अवस्थेत असल्याचे सांगितले. पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास चोरटे अल्टो कारमधून आले. त्यांनी ग्रीलचे कुलुप तोडून आतमध्ये प्रवेश केला; मात्र शटर उचकटले नसल्याने व जॉगर्सदेखील ये-जा करु लागल्याने तेथून चोरट्यांनी पळ काढला. बाबर यांच्या फिर्यादीवरुन चोरट्यांविरुध्द नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Thieves broke into a jewelery shop wearing PPE suits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.