चालकास मारहाण करून कार घेवून चोरटे फरार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 01:03 IST2020-08-17T19:33:59+5:302020-08-18T01:03:52+5:30
ओझरटाऊनशिप. : येथील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या एच ए एल उड्डाणपु लगतच्या सर्व्हिसरोडवर स्कार्पिओ कार अडवून चालकास मारहाण करून चौघा चोरट्यांनी स्कार्पिओसह मोबाईल घेवून पलायन केले.

चालकास मारहाण करून कार घेवून चोरटे फरार
ओझरटाऊनशिप. : येथील मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या एच ए एल उड्डाणपु लगतच्या सर्व्हिसरोडवर स्कार्पिओ कार अडवून चालकास मारहाण करून चौघा चोरट्यांनी स्कार्पिओसह मोबाईल घेवून पलायन केले.
रविवारी (दि.१६) पहाटेच्या सुमारास सचिन दत्तात्रय सांळूके (धुळे) हे त्यांच्या पांढऱ्या स्कार्पिओने (एम एच १८ डब्लू ७१२०) नाशिकहून धुळे येथे जात असताना एच ए एल उड्डाणपुला लगतच्या सर्व्हिस रोडवर एका इंडिका कार मधून आलेल्या २५ते ३० वयोगटातील चौघाजणांनी स्कार्पिओच्या समोर इंडिका आडवी लावली स्कार्पिओ थांबताच चालकास गाडीच्या बाहेर ओढून लोखंडी रॉड डोक्यात मारून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून सांळूके यांच्या ताब्यातील स्कार्पिओ व एक मोबाईल असा सुमारे ५ लाख ५५ हजाराचा ऐवज घेवून पलायन केल. या प्रकरणी कार चालक साळंूके यांनी ओझर पोलिस स्टेश्नमध्ये तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी चौघा चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक अजय कवडे हे करीत आहेत.