शहरं
Join us  
Trending Stories
1
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
2
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
3
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
4
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
5
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
6
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
7
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
8
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
9
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
10
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
11
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
12
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

मंजिल उन्हीको मिलती हैं...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 00:59 IST

मनात असलेली जिद्द अन् देशसेवेच्या घेतलेल्या ध्यासापोटी अंगावर खाकी मिरवत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेत ६८८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने न्यायपूर्वक व्यवहार व कर्तव्यपालनाची शपथ ग्रहण केली.

नाशिक : मनात असलेली जिद्द अन् देशसेवेच्या घेतलेल्या ध्यासापोटी अंगावर खाकी मिरवत ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद घेत ६८८ प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांनी उगवत्या दिनकराच्या साक्षीने न्यायपूर्वक व्यवहार व कर्तव्यपालनाची शपथ ग्रहण केली. निमित्त होते, महाराष्ट पोलीस प्रबोधिनीच्या ११७व्या तुकडीच्या दीक्षांत सोहळ्याचे.महाराष्टच्या मातीत गिरविले धडेगोवा पोलीस दलातील २० पुरुष प्रशिक्षणार्थ्यांनी येथील पोलीस अकादमीत फौजदाराचे धडे गिरविले. राज्याच्या ६६८ प्रशिक्षणार्थ्यांसोबत सशस्त्र संचलन केले. यावेळी मयूर सावंत म्हणाले, प्रशिक्षण सुरुवातीला खूप कठीण वाटत होते. महाराष्टÑाच्या नाशिकमधील अकादमीत दर्जेदार असे प्रशिक्षण मिळाले. महाराष्टÑाच्या मातीत प्रशिक्षणाचे धडे गिरविताना खूप आनंद अन् अभिमान वाटत होता. येथील प्रत्येक प्रशिक्षकाने आमच्यावर खूप मेहनत घेतली. सुरुवातीला माझे वजन ९२ किलो होते, मात्र येथील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता ७२ किलोवर आले आहे. यावरून प्रशिक्षणाचा दर्जा व गुणवत्ता लक्षात येते, असे स्वदेश देसाई म्हणाले. तसेच खाकी अंगावर आल्याचा खूप आनंद होत आहे. सुरुवातीचे सहा महिने असे वाटत होते की, प्रशिक्षण आपण पूर्ण करू शकू की नाही. मात्र यानंतर महाराष्ट्राच्या मातीत आम्ही चांगलेच रुळल्याची भावना मंदार परब यांनी व्यक्त केली.शहीद पित्याचे स्वप्न करणार पूर्ण३० आॅगस्ट २०१६ साली वांद्रे पश्चिम येथे वाहतूक पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना विलास शिंदे नामक कर्मचाऱ्याच्या डोक्यात काही समाजकंटकांनी लोखंडी सळईने हल्ला चढविला होता. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा दिपेश शिंदे याने वडिलांचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास घेतला. अनुकंपा तत्त्वावर त्यांना पोलीस दलात नोकरी मिळाली. त्यानंतर दीपेश यांनी प्रशिक्षण पूर्ण क रत शपथ घेतली....अन् डोळ्यात तरळले आनंदाश्रूकुटुंबापासून सुमारे १२ ते १४ महिने दूर राहत खडतर असे प्रशिक्षण घेत स्वत:च्या शरीरयष्टीपासून देहबोलीपर्यंत आमूलाग्र बदल घडविणाºया प्रशिक्षणार्थी फौजदार महिला, पुरुषांपैकी बहुतांश प्रशिक्षणार्थ्यांच्या डोळ्यात माता, पिता, भाऊ, बहीण पत्नी, मुलांना भेटल्यानंतर आनंदाश्रू तरळल्याचे पहावयास मिळाले. बहुतांश माता-पित्यांनी आपल्या कष्टाचे झालेले चीज आपल्या फौजदार मुला-मुलींच्या डोळ्यांत निरखून बघितले त्यावेळी त्यांच्याही डोळ्यांच्या कडा पाणावल्या.

टॅग्स :PoliceपोलिसNashikनाशिक