दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा भासणार तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 07:06 PM2020-04-28T19:06:17+5:302020-04-28T19:27:11+5:30

खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात सुमारे दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

There will be a shortage of one and a half thousand quintals of soybean seeds | दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा भासणार तुटवडा

दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा भासणार तुटवडा

Next
ठळक मुद्देसोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्या शक्यतादीड हजार क्विंटल बियाणे कमी उपलब्ध होण्याचे संकेत

नाशिक : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्हाभरातून जवळपास आठ हजार क्विंटल सोयाबिन बियाण्याची मागणीची शक्यता असताना महाबीजकडून केवळ ६ हजार पाचशे क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता कंपनीच्या नाशिक जिल्हा व्यवस्थापकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर्षी खरिपाच्या हंगामात सुमारे दीड हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाण्याचा तुटवडा भासण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी पॅकिंगचे महागडे बियाणे खरेदी न करता घरगुती बियाणे वापरण्याचा सल्ला महाबीजकडून देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अनेक सोयाबीन उत्पादक शेतकरीही घरगुती बियाणे वापराच्या तयारीत आहेत. नाशिक जिल्ह्यात गेल्यावर्षी महाबिज ८ हजार क्विंटल सोयाबीनच्या बियाण्याची, ४ हजार पाचशे क्विंटल, मका पाचशे क्विंटल व ज्वारी ५० क्विंटल बियाण्याची विक्री झाली होती. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाचे महाबिहला यावर्षी खरिप पेरणीसाठी बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. परंतु यावर्षी सोयाबीनचे ६ हजार पाचशे क्विंटल,भाताचे ५ हजार क्विंटल, मका पाचशे व ज्वारी ५० क्विंटल बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचे महाबिजचे जिल्हा व्यवस्थापक जगदीश गीरी यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर यावर्षी शेतकऱ्यांची बियाणे तसेच खते खरेदी करताना तारांबळ उडण्याची शक्यता आहे. शासनाने लॉकडाउनमधून कृषी विषयक बाबींना वगळले असले, तरी प्रत्यक्षात लॉकडाउनचा परिणाम बियाणे व खते खरेदीवरही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात सोयाबीन उत्पादक शेकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने तसेच घरगुती बियाणे पेरणीयोग्य असल्याने शेतकरी व कृषी विभाग त्या दष्टीने तयारीला लागला आहे. घरात असलेले सोयाबीन पेरणीयोग्य आहे का याबाबत शेतकऱ्यांनी बियाण्याची उगवण क्षमता तपासून घ्यावी असा सल्ला कृषी तज्ञांकडून दिला जात आहे. त्यासाठी कुंडीत घरातील बियाण्याची उगवण करून शंभर पैकी ७० बियांची उगवण झाल्यास असे बियाणे पेरणीसाठी वापरण्याचा सल्लाही कृषी तज्ज्ञांनी दिला आहे. कोट - गतवर्षी सोयाबिन काढणीच्या हंगामात अवकाळी पावसामुळे व हवामानातील अनियमित बदलांमुळे सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले होते. त्याचा परिणाम बियाणे निर्मिती वरही झाल्याने मागणीच्या तुलनेत कमी बियाणे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. पॅकिंगच्या बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्के असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी घरगुती बियाण्याची कुंडीत उगवण क्षमता तपासून पेरणी करण्यास हरकत नाही.

जगदीश गिरी - नाशिक जिल्हा व्यवस्थापक, 

Web Title: There will be a shortage of one and a half thousand quintals of soybean seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.