शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

थकीत देणीप्रकरणी बैठक होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 00:47 IST

क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीकडे ११० लघुउद्योजकांचे पैसे अडकल्याने हे उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत, तर जवळपास ३ हजार कामगारांचे रोजगार धोक्यात आल्याची तक्रार आल्यानंतर लवकरच उद्योजक, कंपनी व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ग्वाही दिली.

सातपूर : क्रॉम्प्टन ग्रिव्हज कंपनीकडे ११० लघुउद्योजकांचे पैसे अडकल्याने हे उद्योजक आर्थिक अडचणीत आले आहेत, तर जवळपास ३ हजार कामगारांचे रोजगार धोक्यात आल्याची तक्रार आल्यानंतर लवकरच उद्योजक, कंपनी व्यवस्थापनाची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलाविण्यात येणार असल्याची जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी ग्वाही दिली.निमा कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योगमित्रची सभा घेण्यात आली. या सभेत दिंडोरी येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीतील भूखंडाचा दर कमी करावा, अंबड येथील मोकळ्या भूखंडांना तारेचे कुंपण करणे, सातपूर, अंबड भागात सांडपाणी वाहून जाण्यासाठी ड्रेनेजची व्यवस्था करणे, रस्त्यांची डागडुजी करणे, पथदीप दुरुस्त करणे, औद्योगिक वसाहतीत स्वच्छतागृहे व बसथांबे उभारणे, माळेगाव वसाहतीत प्रथमोपचार केंद्र सुरू करणे व घंटागाडीची सुविधा मिळणे, ईएसआय रुग्णालयाकडून प्रलंबित देयके मिळावीत, औद्योगिक प्रदर्शनासाठी कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी, सातपूर, अंबड औद्योगिक वसाहतीत भुयारी गटार योजना राबविणे, डिफेन्स इनोव्हेशन हबसाठी दिंडोरी येथे जागा उपलब्ध करून देणे, अंबड येथील शांतीनगर व रमाबाई आंबेडकरनगर झोपडपट्टी स्थलांतरित करणे आदींसह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिलेत. राज्यातील एमआयडीसीच्या प्रादेशिक कार्यालयांपैकी नाशिकचे कार्यालय सर्वोेत्कृष्ट ठरले आहे. तसेच या कार्यालयाने वृक्षलागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केल्याने प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी संमत करण्यात आला.या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. भुवनेश्वरी, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हेमांगी पाटील, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे आदी उपस्थित होते. यावेळी निमाचे उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी, आयमाचे अध्यक्ष वरुण तलवार, लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष संजय महाजन, धनंजय बेळे, अभय कुलकर्णी, प्रदीप पेशकार, सुधाकर देशमुख, निखिल पांचाळ, संजय सोनवणे, उदय रकिबे आदींनी चर्चेत भाग घेतला. यावेळी कैलास आहेर, ललित बूब, नितीन ठाकरे, राजेंद्र कोठावदे, बाळासाहेव गुंजाळ, मिलिंद राजपूत, नितीन वागस्कर, दिलीप वाघ, नीलिमा पाटील, योगिता आहेर आदींसह उद्योजक व शासकीय, निमशासकीय विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.सूरज मांढरे : उद्योगक्षेत्राची प्रतिमा मलिन करू नयेनिमाचे माजी अध्यक्ष अभय कुलकर्णी यांनी एमआयडीसी कार्यालयावर आरोप केले, त्यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी असे बिनबुडाचे आणि कोणताही पुरावा नसताना आरोप करून उद्योगक्षेत्राची प्रतिमा मलिन करू नये. नाशिकच्या औद्योगिक क्षेत्राचे वातावरण कोणीही नकारात्मक करण्याचा प्रयत्न करू नका, असे निर्देश दिले. तसेच दर तीन महिन्यांनी ही सभा होत असल्याने खूप विषय प्रलंबित राहतात, याबाबत दर महिन्याला यातील विषयांवर वेळच्या वेळी निर्णय घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश भामरे यांना दिले.

टॅग्स :MIDCएमआयडीसीbusinessव्यवसाय