भाबडबारीत अपघातांची मालिका सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 18:25 IST2018-09-06T18:24:57+5:302018-09-06T18:25:27+5:30

There is a series of fluttering accidents | भाबडबारीत अपघातांची मालिका सुरूच

भाबडबारीत अपघातांची मालिका सुरूच

ठळक मुद्देबसची जीपला धडक; १२ जखमी :

देवळा/लोहोणेर : - देवळा शहरापासून तीन किलोमीटर अंतरावरील रामेश्वर फाट्याजवळ बस व मालवाहतूक करणाऱ्या पीकअप वाहनाचा अपघात होऊन १२ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर देवळा ग्रामीण रु ग्णालयात उपचार करण्यात आले.
गेल्या दोन दिवसांपूर्वी भावडबारी घाटाच्या पायथ्याशी अपघात होऊन चार जणांचा मृत्यू झाला होता. त्याच नंदुरबार आगाराच्या बसला पुन्हा अपघात झाल्याने अपघातांचे सत्र सुरू आहे. खडकतळे (ता. देवळा ) येथील मालवाहतूक पीकअप पिंपळगाव बसवंत येथे टमाटे विक्र ीसाठी घेऊन जात होती.
दुपारी दीड वाजेच्या सुमारास रामेश्वर फाट्याजवळ भरघाव वेगात असलेल्या मुंबई -नंदुरबार बसने (एम. एच. २०-बी. एल. ३१०८) पीकअपला (एम. एच.४१-जी ९६८४) जोरदार धडक दिल्याने बसमधील १२ प्रवासी जखमी झाले आहेत. बसच्या चालकाला अधिक उपचारासाठी मालेगाव जिल्हा रु ग्णालयात हलविण्यात आले.
जखमींमध्ये बसचा चालक फारूक कुरेशी (नंदुरबार ), लीलाबाई साहेबराव भदाणे,साहेबराव पुंडलिक भदाणे ( उंभरटी,साक्र ी), तुषार मनोहर वसावे ( धानोरा ), मारु ती नाथू जाधव, मेघनाथ वसंत पवार ( खडकतळे ), शाम जवशील (बेंगलोर), अनिता रेबेका (बेंगलोर ), अशोक चिंतामण शिंदे (जालना ), सुनंदा अशोक बच्छाव ( माळवाडी ), रॉबिन चांदणे ( देवळाली कॅम्प ), पुष्पलता शिवाजी देवरे ( साक्र ी ) आदींचा समावेश आहे.

Web Title: There is a series of fluttering accidents