वनपरिक्षेत्र अधिकारीच नाहीत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 19:14 IST2020-09-09T19:14:26+5:302020-09-09T19:14:59+5:30
त्र्यंबकेश्वर : वन विभागाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना तालुक्यातील दोन्हीही वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या अन्यत्र करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन्हीही ठिकाणच्या जागा रिक्त ठेउन येथील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

वनपरिक्षेत्र अधिकारीच नाहीत !
लोकमत न्युज नेटवर्क
त्र्यंबकेश्वर : वन विभागाच्या अंतर्गत त्र्यंबकेश्वर तालुक्यात अनेक प्रश्न प्रलंबित असतांना तालुक्यातील दोन्हीही वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या अन्यत्र करण्यात आल्याचे समजते. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर व हरसुल या दोन्हीही ठिकाणच्या जागा रिक्त ठेउन येथील अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
वास्तविक तालुक्यात वनपट्टे वनहक्क समित्यांचे प्रश्न अतिक्र मण वन्य प्राणी संरक्षण बेकायदा वृक्ष तोड कुºहाड बंदी गड किल्ले संरक्षण त्यात गेल्या वर्षभरापासुन तालुक्यात किमान ७,८ बिबटे तरी असतील या बिबट्यांनी पाळीव प्राणी, कोंबड्या, कुत्री, गायी, बैल, कालवड, गोºहे आदींचा फडशा तर पाडलाच आहे पण चाकोरे सारख्या गावातील माणसावर जीवघेणा हल्ला केला होता. आदी अनेक प्रश्न प्रलंबित असतांना त्र्यंबकेश्वर सारख्या आदिवासी तालुक्यात वनपरिक्षेत्र अधिकारी नाहीत हे जरा विचित्रच वाटते. यासाठी एक तर बदली झालेले अधिकारी बदली होउन सोडले नसतील तर त्यांना सोडू नका, किंवा बदली होउन संबंधीत बदलीच्या गावी गेले असतील तर त्वरीत नवीन अधिकारी रु जु करु न घ्या अशी मागणी तालुक्यातील लोक करत आहेत. या कामी तालुक्याचे आमदार हिरामण खोसकर यांनी विशेष लक्ष घालुन अधिकारी बदलीचा विषय सोडवावा अशीही मागणी लोकांनी केली आहे.