शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

संवादाअभावी मुले होताहेत बेदरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:28 AM

चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत चाललेले महत्त्व, पालकांकडून मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य, सोशल मीडियाद्वारे मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे हल्लीची किशोरवयीन मुले अतिधाडसी, उद्धट होत चालली आहे.

नाशिक : चामरलेणीवर अडकलेली सिडकोतील चार शाळकरी मुले व त्यांच्या सुटकेसाठी यंत्रणेने केलेले शर्थीचे प्रयत्न या प्रकरणामुळे मुलांचा अतिधाडसीपणा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.  शाळेतली जीवघेणी स्पर्धा, विभक्त कुटुंबामुळे घरातील संस्काराचा अभाव, भावनिकतेचे कमी होत चाललेले महत्त्व, पालकांकडून मिळणारे अवाजवी स्वातंत्र्य, सोशल मीडियाद्वारे मिळणारे अर्धवट ज्ञान यामुळे हल्लीची किशोरवयीन मुले अतिधाडसी, उद्धट होत चालली आहे. शिक्षक, पालक, नातेवाईक यांनी मुलांचा विश्वास संपादन करून त्यांच्यात आदरयुक्त धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे.  वेळीच हा धोका ओळखून पालक-शिक्षकांनी पावले उचलली नाही तर मुलांचा धाडसीपणा वाढत जाऊन पुढची पिढी बेजबाबदार व दुराग्रही होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पिढीला चुकीच्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी मोठ्यांची असून, ती त्यांना पार पाडावीच लागेल, असे मत मानसोपचारतज्ज्ञ, बालरोगत्ज्ज्ज्ञ, अभ्यासक यांनी व्यक्त केले आहे. मुले ऐकत नाहीत, उलट उत्तरे देतात. त्यामुळे पालक म्हणून हल्ली रोज पोटात भीतीचा गोळा उठतो. महागाई पाहता नोकरी करण्यावाचून पर्याय नाही. मुले म्हातारपणाची काठी होतील ही अपेक्षा तर केव्हाच सोडून दिली आहे. पण मोठेपणी ते आदर्श नागरिक होतील का, समाजात स्वत:चे चांगले स्थान निर्माण करतील का, दोन पैसे कमवून किमान स्वत:चे पोट भरू शकतील का याचीही शाश्वती वाटत नाही.  - मंगला किणीकर, पालक, कॉलेजरोड पालकांचा धाक न वाटणे, उद्धटपणा वाढणे याला असंख्य गोष्टी कारणीभूत आहेत. गुणांच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे मुले सैरभैर झाली आहेत. त्यामुळे समजत असूनही ते चुकीच्या गोष्टी करत आहेत. पालक कधी खूप मोकळीक देतात, तर कधी अतिधाक दाखवतात. विभक्त कुटुंबामुळे मुले एकटी पडतात. मुलांमध्ये भावनिक बांधिलकी उरलेली नाही. कुटुंब, पालक, मित्र यांच्याशी कोरडी, कामचलाऊ मैत्री करण्यावर ते भर देत आहेत.  - शामा कुलकर्णी, बालरोगतज्ज्ञ सोशल मीडिया, मोबाइल, पैशांची समृद्धी या साºयामुळे हल्लीची किशोरवयीन पिढी उद्धट होत चालली आहे. याला मुले जितकी कारणीभूत आहेत, तितकेच पालकही कारणीभूत आहेत. एकीकडे मुले अभ्यासात मागे पडताच शिक्षकांवर दबाव आणला जातो, तर दुसरीकडे शाळेने थोडी जरी कडक भूमिका घेतली तरी लगेच शाळा गाठत जाब विचारला जात आहे.  - रमादेवी रेड्डी, प्राचार्य, स्कॅटिश अकॅडमी

टॅग्स :docterडॉक्टरNashikनाशिक