..अखेर ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळाली रक्कम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:14 IST2020-08-19T21:25:29+5:302020-08-20T00:14:33+5:30
पेठ : तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे शेततळे बांधकाम करून देण्याच्या बोलीवर एका खासगी ठेकेदाराने हडप केलेले जवळपास तीन लाख २५ हजार रुपये अखेर परत मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.

..अखेर ‘त्या’ शेतकऱ्यांना मिळाली रक्कम !
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील १९ शेतकऱ्यांचे शेततळे बांधकाम करून देण्याच्या बोलीवर एका खासगी ठेकेदाराने हडप केलेले जवळपास तीन लाख २५ हजार रुपये अखेर परत मिळाल्याने शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे.
कृषी विभागाकडून मंजूर झालेल्या शेततळ्याच्या कामापोटी एका खासगी ठेकेदाराने शेतकºयांकडून अनामत रक्कम जमा करून हडप केल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकºयांनी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या माध्यमातून पेठ पोलिसात तक्रार दाखल केली.
याबाबत ‘लोकमत’मधून या प्रकरणाला प्रसिद्धी दिल्याने पोलीस प्रशासन व परिषदेच्या वतीने संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून समन्वय घडवून आणला. अखेर ठेकेदाराने शेतकºयांकडून घेतलेले पैसे परत केले असून, ऐन अडचणीच्या काळात पैसे परत मिळाल्याने फसवणूक
झालेल्या शेतकºयांनी समाधान व्यक्त केले आहे. तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकºयांचा अज्ञानाचा गैरफायदा घेत संबंधित ठेकेदाराने पैसे उकळवून घेतले; मात्र शेततळ्याचे काम करून न दिल्याने संतापलेल्या शेतकºयांनी परिषदेच्या माध्यमातून उठाव केला. या प्रकरणात लोकमतने ठळक प्रसिद्धी दिली. अखेर संबंधित ठेकेदारास शेतकºयांना त्यांची रक्कम परत करणे भाग पडले.
- गणेश गवळी, कार्याध्यक्ष,
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद