"...मग मला मुख्यमंत्री करा", नरहरी झिरवाळ यांचं मिश्किल विधान

By संदीप भालेराव | Published: May 8, 2023 06:47 PM2023-05-08T18:47:16+5:302023-05-08T18:48:00+5:30

राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो.

then make me Chief Minister, narhari zirwal's barely spoke |  "...मग मला मुख्यमंत्री करा", नरहरी झिरवाळ यांचं मिश्किल विधान

 "...मग मला मुख्यमंत्री करा", नरहरी झिरवाळ यांचं मिश्किल विधान

googlenewsNext

नाशिक : राज्यातील सत्तासंघर्षावर येत्या आठ दिवसात सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येऊ शकतो. पण, लोक आताच प्रश्न विचारू लागले आहेत पुढे काय होणार? सरकार पडले तर? अशा जर तरच्या प्रश्नांवर मी काय बोलणार, मी तर म्हणेन मला मुख्यमंत्री करा, असे विधान नरहरी झिरवाळ यांनी केले. मागे एका कार्यक्रमात अजित पवार यांनी ’आपणाला मुख्यमंत्री होणे आताही आवडेल,’ असे माध्यमांना सांगितले तेव्हा माध्यमांनी त्यावरच फोकस केल्याची आठवण करून देताना आता माझ्या विधानाबाबत असे करू नका, असा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला.

आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर माध्यमांनी सोमवारी (दि. ८) नाशिकमध्ये विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना विचारले असता त्यांनी न्यायालयाचा निकाल सर्वोच्च असल्याचे म्हटले. आमदार अपात्रतेबाबत आपण घटनेनुसारच पत्र दिले असून, आमदार अपात्र ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण आपल्याकडे आल्यानंतर पुढे काय करायचे ते पाहू, असेही ते म्हणाले.

आमदार अपात्रतेबाबत न्यायालयच निर्णय घेणार असल्याने आता निर्माण होणारे हे सर्व जर - तरचे प्रश्न आहेत. मात्र, अपात्रतेसंदर्भात आपण दिलेल्या पत्राला अधिक महत्व असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. घटनेच्या नियमानुसार अनुसरूनच आपण निर्णय दिलेला असून, निर्णय विरोधात गेला तर घटनेला चुकीचे म्हणणार का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दादा भाजपात जाणार नव्हतेच. शरद पवार यांच्या राजीनाम्यापूर्वी एक महिना अगोदरच अजित पवार भाजपामध्ये जाणार असल्याच्या वावड्या उठल्या होत्या. परंतु, दादा कधीही भाजपात जाणार नव्हते. आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ तर दादा जातील ना, असेही झिरवाळ म्हणाले. राजीनामा प्रकरणावर भाजपाबरोबर जाऊ पाहणाऱ्या आमदारांचीच समिती नियुक्त करण्यात आल्याच्या वृत्ताचाही त्यांनी समाचार घेतला. अशी कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नसल्याने कुणी बाहेर जाण्याचा प्रश्नच नव्हता, असे झिरवाळ म्हणाले.

 

Web Title: then make me Chief Minister, narhari zirwal's barely spoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.