शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

..तर भाजपाला दोनशे जागाही मिळणार नाहीत : राज ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2018 1:50 AM

देशातील जनतेचा ट्रेंड बदलला आहे, त्याची सुरुवात गुजरात राज्यातील निवडणुकीपासून झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपीच असलेल्या गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले, तर कॉँग्रेस कुठून कोठपर्यंत पोहोचून गेली.

नाशिक : देशातील जनतेचा ट्रेंड बदलला आहे, त्याची सुरुवात गुजरात राज्यातील निवडणुकीपासून झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होमपीच असलेल्या गुजरातमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपाला ९९ जागांवरच समाधान मानावे लागले, तर कॉँग्रेस कुठून कोठपर्यंत पोहोचून गेली. २०१४च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा विचार केला तर भाजपाला गुजरातमध्ये १६५ जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु नरेंद्र मोदींसह अख्खा भाजपा या निवडणुकीत विजयासाठी लढूनही त्यांचा तसा पराभवच झाला, दुसरीकडे एकटे राहुल गांधी कॉँग्रेससाठी लढत होते. या सर्व गोष्टींचा विचार करता,  आज जर लोकसभेची निवडणूक झाली तर भाजपाच्या ७० ते ८० जागा कमी होतील. येणाऱ्या निवडणुकीत भाजपाला २०० जागाही मिळणार नाही असे भाकीत महाराष्टÑ नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.धुळ्याहून नाशिकमार्गे मुंबईकडे परतणाºया ठाकरे यांनी सोमवारी शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला, ते पुढे म्हणाले, देशासमोर भाजपाशिवाय पर्याय नाही, असा भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसे असते तर इंद्रकुमार गुजराल, देवेगौडा, चंद्रशेखर हे पंतप्रधान कधी झाले असते काय? महात्मा गांधी यांनी नेहरूंचे नाव पंतप्रधानपदासाठी पुढे केले म्हणून ते झाले, त्यानंतर इंदिरा गांधी, राजीव गांधी पंतप्रधान झाले, तेव्हा कोणीच आजन्म कोणत्याच पदासाठी कायम नसतो. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आपोआपच पंतप्रधानपदाचा उमेदवार समोर येतो. आपल्या लोकशाहीत अगोदर खासदार निवडून यावा लागतो व नंतर पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरतो हे लक्षात घेतले पाहिजे. असे सांगून राज ठाकरे यांनी दुसरे महायुद्ध जिंकून आलेल्या विल्यम चर्चिलचे उदाहरण दिले. युद्धानंतर झालेल्या निवडणुकीत चर्चिलचा तेथील जनतेने पराभव केला, कारण चर्चिल युद्ध जिंकण्यासाठी योग्य होता, देश चालविण्यासाठी नव्हे, त्यामुळे जनता नुसतीच सुशिक्षित असून, चालत नाही, ती सुज्ञ असणेही गरजेचे असल्याचे सांगितले.* कालिदासच्या भाडेवाढीत लक्ष घालणारया चर्चेत राज ठाकरे यांनी कालिदास कलामंदिराच्या भाडेवाढीची माहिती जाणून घेतली व लगेचच मुंबईला संपर्क करून तेथील नाट्यगृहांचे किती भाडे आहे याची माहिती घेतली. मुंबईत शनिवार, रविवारी १५ ते २० हजार रुपये भाडे आहे, त्या मानाने नाशिकला दुप्पट भाडे असल्याचे ते म्हणाले. स्थानिक संस्थांची आर्थिक क्षमता असल्यामुळेच वास्तू उभारल्या जात असल्या तरी, त्याचा वापर सामान्यांना सुलभपणे करता यावा, असा हेतू असणे आवश्यक आहे. पैसे कमाविणे हा उद्देश असेल तर त्या वास्तुंचा काय उपयोग? असा सवालही त्यांनी केला. कालिदासच्या भाडेवाढीत आपण लक्ष घालू, असे आश्वासनही त्यांनी दिले.* महाराष्टतील रस्त्यांची वाट लागलीऔरंगाबादहून धुळ्याला व तेथून नाशिकला येताना रस्त्यांची अक्षरश: वाट लागल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. महाराष्टÑ पुन्हा एकदा खड्ड्यात गेल्याचे सांगून, नाशिक दौºयावर येत असताना शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचे खड्ड्यामुळे टायर फुटल्याची माहिती ठाकरे यांनी जाणून घेतली. सरकारच्या कामाचे मूल्यमापन जनताच करेल, असे ते म्हणाले.काम केल्याने मते मिळतात हा भ्रमकामे केल्याने मते मिळतात हा भ्रम असल्याचे सांगून ठाकरे यांनी अप्रत्यक्ष नाशिककरांवरची नाराजी प्रकट केली. नाशिकमध्ये मनसेची सत्ता असताना खूप कामे करण्यात आली, अजित पवार यांच्या ताब्यात पिंपरी-चिंचवड महापालिका असताना खूप मोठी कामे झाली, परंतु निवडणुकीत लोकांनी सत्ता दुस-यांच्या ताब्यात दिली हे पाहिल्यावर लोकांना कामे न करणारा राजकीय पक्ष हवा असतो यावर माझा ठाम विश्वास बसल्याचे ते म्हणाले.तुकाराम मुंढे यांच्यावर टीकामहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आजवर काय कामे केली ती मी पाहिलेली नाही किंवा त्यांच्याशी कधी संबंध आला नाही, परंतु एकूणच होणाºया तक्रारी पाहता मुंढे हे उर्मट अधिकारी असल्याचे जाणवते. प्रशासनाने प्रशासकीय कामे करावीत, परंतु लोकप्रतिनिधींचा मानसन्मानही राखला जावा, सारेच जर आयुक्त करणार असतील तर निवडणुका तरी कशाला घ्यायच्या? असा सवाल राज ठाकरे यांनी केला. आमची सत्ता असताना अधिकाºयांना राज्य सरकार कामे करू देत नव्हते, आता त्यांची सत्ता आल्यावर अधिकारी कामे कशी काय करू लागले, अशी विचारणाही त्यांनी केली.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेBJPभाजपा