दोन लाखांच्या महागड्या दुचाकीची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 00:56 IST2018-07-14T00:55:57+5:302018-07-14T00:56:15+5:30
इंदिरानगर : राजीवनगर परिसरातून दोन लाख किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़ ११) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़

दोन लाखांच्या महागड्या दुचाकीची चोरी
इंदिरानगर : राजीवनगर परिसरातून दोन लाख किमतीची दुचाकी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवारी (दि़ ११) मध्यरात्रीच्या सुमारास घडली़
कानिफनाथ चौकातील चंद्रभागा अपार्टमेंटमधील रहिवासी प्रसाद शिंदे यांनी बुधवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे आपली दोन लाख रुपये किमतीची दुचाकी (एमएच १५, एफडब्ल्यू ६४५३) पार्किंगमध्ये लावली होती़ मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली़ याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.