सातपूर परिसर, नाशिकरोडमधून दुचाकींची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:36 IST2019-11-08T23:17:57+5:302019-11-09T00:36:33+5:30
शहरातील सातपूर व नाशिकरोड परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

सातपूर परिसर, नाशिकरोडमधून दुचाकींची चोरी
नाशिक : शहरातील सातपूर व नाशिकरोड परिसरातून वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. सातपूरच्या सप्तशृंगीदेवी मंदिराजवळ, एमएचबी कॉलनीतील हर्षलकुमार प्रभाकर बागड (२५) यांची स्वमालकीची दुचाकी (क्र.एमएच १५ सीजी ०००७) चोरट्यांनी लांबविली. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार भिसे अधिक तपास करीत आहेत, तर दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घटली. अशोक एकनाथ जाधव (३७) यांची स्वमालकीची दुचाकी (क्र. एमएच १५, डीझेड ९२०६) चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे.